Uddhav take jab on CM : विकृत आणि हिणकस : उद्धव यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Uddhav take jab on CM

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठी प्रश्नावर राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांचा रूदाली असा उल्लेख केला होता. आमचे सरकार पाडल्याचे रडगाणे उद्धव ठाकरे यांनी गायले. मराठी भाषेबद्दल त्यांच्या भाषणात साधा उल्लेखही नव्हती अशी टीका फडणवीस यांनी केली होती. (Uddhav take jab on CM)

त्यावर उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ‘‘मराठी माणसाचे आनंदाचे क्षण त्यांना रूदाली वाटत असतील तर ती अतिशय विकृत आणि हिणकस वृत्तीचे लोक आहेत,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

दु:ख व्यक्त करण्यासाठी उर बडवायलाही यांच्याकडे मूळ माणसेही नाहीत. त्यांना ती इतर पक्षातून घ्यावी लागत आहेत. मी फडणवीसांची प्रतिक्रिया समजू शकतो, असे ते म्हणाले. (Uddhav take jab on CM)

उद्धव ठाकरे म्हणाले, “न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या मराठी माणसाची तुलना जे कुणी भाजपावाले पहलगामच्या दहशतवाद्यांशी करत असतील, तर ते मराठीचे मारेकरी आहेत, ते महाराष्ट्राचेही मारेकरी आहे. पहलगाममधील दहशतवादी भाजपात गेले का? हे त्यांनी सांगावं. ते गेले कुठे? ज्यांनी आमच्यावर आरोप केला, त्यांच्या घरात ते राहात आहेत का? त्यांना लाज वाटली पाहिजे. एकतर तुम्ही हिंदूंनाही वाचवू शकत नाही. वर मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता. असे कर्मदरिद्री लोक महाराष्ट्रात राज्यकर्ते आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.” (Uddhav take jab on CM)

फडणवीस काय म्हणाले होते?
मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपले नाव घेतल्याबद्दल समाधान वाटल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “मला सांगण्यात आले होते, की विजयी मेळावा होणार आहे. पण तेथे तर रुदालीचे भाषणही झाले. मराठीबद्दल एक शब्दही न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सत्ता द्या, निवडून द्या असा प्रकार तिथे सुरू होता.”

हेही वाचा :
२६/११ च्या हल्ल्यावेळी मुंबईतच होतो : राणा; आयएसआयचा सहभाग स्पष्ट
बिहारनंतर आता प.बंगाल आणि दिल्लीत मतदार तपासणी मोहीम

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर