मुंबई : विशेष प्रतिनिधी : ‘‘आमचे भांडण कधी नव्हतेच, तरीही ते मिटवल्याचे मी जाहीर करतो. मात्र त्यांनी शपथ घ्यायला हवी. त्यावेळेला सर्व मराठी माणसांनी ठरवायचे की भाजपाबरोबर जायचे की माझ्याबरोबर यायचे. महाराष्ट्राचे हित ही एकच माझी शर्त आहे. पण मग बाकीच्यांना गाठीभेटी आणि कळत नकळत प्रचार करायचा नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची. आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्याचवेळी त्यांच्यासमोर अटीही घातल्या. (Uddhav’s reply)
मी उद्धव ठाकरेंबरोबर जायला तयार आहे, पण त्यांना माझ्याबरोबर यायचे आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले.
राज ठाकरे यांनी, “आमच्यातील वाद किरकोळ आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे,” असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देताना उद्धव ठाकरेंनी काही अटी-शर्ती ठेवल्या.
दादर येथील श्री छत्रपती महाराज शिवाजी मंदिर स्मारक मंडळ येथे भारतीय कामगार सेनेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. (Uddhav’s reply)
ते म्हणाले, “किरकोळ भांडणे बाजूला ठेवण्याची माझीही तयारी आहे. मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे मी आवाहन करतो. पण माझीही एक अट आहे. आम्ही लोकसभेवेळी सांगत होतो. ते महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत. तेव्हाच विरोध केला असता तर हे सरकार बसले नसते. राज्याच्या हिताचा विचार करणारे सरकार केंद्रात बसवले असते. त्याचवेळी हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, असला प्रकार चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचे आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, असे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा.” (Uddhav’s reply)
राज ठाकरेंचे वक्तव्य काय?
“एकनाथ शिंदेंचे राजकारण वेगळे आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळे. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते, पण बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावे. अशा लहान-मोठ्या गोष्टींत माझा इगो आणत नाही.”
- राज ठाकरे म्हणाले…
- कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत
- एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही.विषय इच्छेचा आहे
- माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा महाराष्ट्र हडपण्याचा जो प्रयत्न दिसतो त्याविरोधात मी बोलेन तेव्हा हे पक्ष (भाजप) किती साथ देतील माहीत नाही
उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर… - किरकोळ भांडणे बाजूला ठेवण्याची माझीही तयारी आहे
- मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे मी आवाहन करतो
- महाराष्ट्रद्रोह्यांना आधी पाठिंबा द्यायचा, ता विरोध करायचा.मग तडजोड करायची,असला प्रकार चालणार नाही
- महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्यांच्या पंक्तीलाही बसणार नाही, असे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा
हेही वाचा :
महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का?
हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपचा अजेंडा
शहांना सोन्याच्या ताटात जेवू घाला, पण…