Two staff members killed  : इस्त्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या

Two staff member killed

वॉशिंग्टन : वॉशिंग्टन डीसीमध्ये एका संशयिताने ज्यू संग्रहालयाजवळ इस्त्रायली दूतवासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्याने ‘फ्री पॅलेस्टाईन’ च्या घोषणा दिल्या. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. इस्त्रायल राजदूत या घटनेत सहभागी नव्हते आणि गोळीबाराच्या वेळी ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, असे इस्त्रायली दुतावासाच्या प्रवक्त्याने सीएननला सांगितले. (Two staff members killed)

वॉशिंग्टन पोलिस प्रमुख पामेला स्मिथ यांनी यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी असे सांगितले की,  ज्युईश म्युझियममधील एका कार्यक्रमातून लोक बाहेर पडत होते. चार व्यक्ती बोलत बाहेर येत असताना संशयित त्यांच्याकडे गेला आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये दोघांचा बळी गेला. मृतामध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. दोघेही मृत व्यक्ती हे इस्त्रायली दुतावासातील कर्मचारी आहेत.

वॉशिंग्टन पोलिस प्रमुखांच्या म्हणण्यानुसार गोळीबार करण्यापूर्वी संशयित व्यक्ती संग्रहालयाबाहेर जाताना दिसला. गोळीबारानंतर सुरक्षा रक्षकांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर तो ‘फ्री पॅलेस्टाईन’ च्या घोषणा देत होत्या. संशयिताची ओळख पटली असून तो शिकागो येथील असून एलियास रॉड्रिग्ज (वय ३०) असे त्याचे नाव आहे. (Two staff members killed)

दरम्यान या घटनेचा अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घटनेचा निषेध केला. हल्लेखोराचे कृत्य ‘यहुदी विरोधावर आधारित’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक्स पोस्टवर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की “यहुदी विरोधावर आधारित या भयानक डीसी हत्याकांडाना आत्ताच थांबावे लागेल!  अमेरिकेत द्वेष आणि कट्टरवादाला स्थान नाही. पिडितांच्या कुटुंबियांबद्दल सहानभुती आहे. अशा गोष्टी घडू शकतात हे खूप दु:खद आहे!. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो!

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर