तृणमुल काँग्रेसमध्ये फूट; ५८ आमदार फुटले

Split in Trinamool Congress; 58 MLAs defect

कोलकोता : महाराष्ट्रात ज्या प्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जशी फूट पडली त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलटफेर झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. तृणमुलमधील बंडखोर ५८ आमदारांच्या नवीन गटाला पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांनी मान्यता दिली असून त्यांनी ऋतब्रता बॅनर्जी यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. (Split in Trinamool Congress; 58 MLAs defect)

तृणमुल काँग्रेसमधून ऋतब्रता बॅनर्जी यांची हकालपट्टी केली होती. पण टीएमसीच्या चिन्हावर निवडून आलेल्या ५८ आमदारांचा त्यांनी स्वतंत्र गट केला आहे. आणखी दोन आमदार सामील होण्याची शक्यता आहे. नवीन गटाला मान्यता मिळाल्यानंतर विरोधी पक्षेनेते ऋतब्रता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत आम्हीच खरे मुख्य विरोधी पक्ष आहोत असा दावा केला. त्यांनी जावेद खान, संदीपन साहा, सबीना यास्मिन, शिउली साहा यांची पक्षाच्या उपनेतेपदी निवड केली. त्यामुळे ममता बॅनर्जी बॅकफूटवर गेल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेसच्या मुख्य सल्लागारांची भूमिका बजावण्याची विनंती ऋतब्रता बॅनर्जी यांनी केली. (Split in Trinamool Congress; 58 MLAs defect)

फुटीर गटाला आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये वाढ होत पक्षांतरबंदी कायद्यानुसार आवश्यक असलेला दोन तृतीयांश मतांचा टप्पा सहपणे ओलांडला. त्यानंतर बंडखोर गटाने ऋतब्रता बॅनर्जी यांची नवीन नेता म्ह्णून निवड केली. बंडखोरांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या अधिकाराला आव्हान दिले पण बंडखोरांनी ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान देण्याचे टाळले आहे. अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात मॅमता बॅनर्जीच पक्षाच्या अध्यक्षा असल्याची मान्यता दिली आहे. पण ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांची विधीमंडळ कारभारातील भूमिका नाकारली आहे. या घडामोडीमुळे टीएमसीने पश्चिम बंगालमधील सर्व संघटनात्मक समित्या बरखास्त केल्या असून पक्षाच्या रचनेचा आढावा घेण्याची घोषणा केली आहे. (Split in Trinamool Congress; 58 MLAs defect)

Related posts

भाजप आमदारांची मंत्री चंद्रकांत पाटील, मुश्रीफांवर टीका

शिवकुमारांच्या मंत्रीमंडळातील मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा दोन दिवसात राजीनामा

भाजप सरकारने देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले