Towel banyan protest : विरोधकांचे टॉवेल बनियन आंदोलन

Towel banyan protest

मुंबई : प्रतिनिधी : विधानभवनाच्या आवारातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चड्डी बनियन टॉवेलवर परिधान करुन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या घटनेवर विरोधक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. आज विधानसभेच्या पायऱ्यावर विरोधकांनी बनियन आणि टॉवेल गुंडाळून निदर्शने केली. (Towel banyan protest)

विधानभवनाच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सर्व मविआचे नेते यावेळी टॉवेल बनियनवर विधानभवनात पोहोचले. तसेच ‘चड्डी बनियन गँग हाय हाय’, ‘या गुंडाराज सरकारचे करायचे काय?’, ‘खाली डोकं वर पाय’, ‘या लुटारू सरकारचे करायचे काय?’, ‘खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या. यावेळी सरकार विरोधात एकच घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला. (Towel banyan protest)

संजय गायकवाड यांच्या विरोधातील बॅनरसुद्धा लक्ष वेधून घेत होता. महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो असा या बॅनरवरती उल्लेख करण्यात आला होता, तर बाजूलाच संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटो होता. (Towel banyan protest)

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कायद्याची भीती आणि सरकारचा धाक राहिलेला नाही, अशी टीका केली. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, मारकुट्या लोकप्रतिनिधींबाबत जनतेत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायद्याची भीतीच उरली नाही अशी टीका केली. (Towel banyan protest)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर