Top per incomes states : महाराष्ट्राची पिछेहाट; दरडोई उत्पन्न घसरले, कर्नाटक अव्वल

Top per incomes states

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. कर्नाटकने दरडोई उत्पन्नात प्रथम क्रमांक पटकावला. पण महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पिछाडीवर गेला असून पाचव्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. तामिळनाडू, हरियाणा, तेलंगना ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत. (Top per incomes states)

भारताचे चालू आर्थिक वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न एक लाख १४ हजार ७१० रुपये झाले आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती दिली. २०१४ १५ मध्ये स्थिर किंमतीवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ७२ हजार ८०५ रुपये होती. दहा वर्षात दरडोई उत्पन्नात ४१ हजार ९०५ रुपये वाढ झाली आहे. (Top per incomes states)

गेल्या दहा वर्षांत देशातील अनेक राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशामध्येही दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. सर्वांत जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या राज्यामध्ये कर्नाटकने प्रथम क्रमांक पटकावला. कर्नाटकचे दरडोई उत्पन्न २ लाख ४ हजार ६०५ रुपये इतके आहे. त्या खालोखाल तामिळनाडूचे १ लाख ९६ हजार ३०९ रुपये, हरियाणाचे एक लाख ९४ हजार २८५ रुपये, तेलंगणाचे १ लाख ८७ हजार ९१२ रुपये आहे. १ लाख ७६ हजार ६७८ रुपयांसह महाराष्ट्राचा क्रमांक पाचव्या क्रमांकावर आहे. (Top per incomes states)

दहा वर्षापूर्वी कर्नाटकचे दरडोई उत्पन्न एक लाख ८५८ होते. २०२४ मध्ये २ लाख ४ हजार ६०५ रुपये आहे. महाराष्ट्राचे २०१३-१४ मध्ये १ लाख ९ हजार ५९७ होते. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राचे उत्पन्न १ लाख ७६ हजार ६७८ इतके झाले आहे. कर्नाटकने गेल्या दहा वर्षात चांगली प्रगती केली असून दरडोई उत्पन्नात पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. महाराष्ट्राची मात्र म्हणावी तशी आर्थिक प्रगती आकडेवारीनुसार तरी झालेली दिसत नाही.

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक