Threat to Mumbai Police: मानवी बॉम्बसह ३४ वाहने, मोठ्या प्रमाणात आरडीएक्स; मुंबई पोलिसांना धमकी

Threat to Mumbai Police

मुंबई : अनंतचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा संदेश वाहतूक पोलिसांना त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर मिळाला आहे. मुंबईतील अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखण्यात येत असल्याचेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.(Threat to Mumbai Police)

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शहरातील ३४ वाहनांमध्ये “मानवी बॉम्ब” बसवण्यात आले आहेत. या स्फोटांमुळे “संपूर्ण मुंबई हादरेल” असा इशारा या संदेशात देण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या १० व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीसाठी पोलिस सुरक्षा व्यवस्था सुरू असताना गुरुवारी वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा संदेश मिळाला, असे अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. (Threat to Mumbai Police)

त्यांनी सांगितले की, गुन्हे शाखेने या धमकीची चौकशी सुरू केली आहे आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि इतर यंत्रणांनाही माहिती देण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्या संघटनेने स्वतःची ओळख ‘लष्कर-ए-जिहादी’ अशी करून १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा केला आहे.

धमकीत असेही म्हटले आहे की हल्ल्यांमध्ये ४०० किलो आरडीएक्स स्फोटके वापरली जातील.

शनिवारी (६ सप्टेबर) १० दिवसांच्या गणेशोत्सवाचा समारोप होत आहे. गणेश विसर्जनासाठी अवघी मुंबई तयार होत असताना, शहरातील रस्त्यांवर लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शोधमोहीमही सुरू आहे. (Threat to Mumbai Police)

उत्सवाच्या काळात समोर आलेल्या संशयास्पद संदेशाच्या स्रोताचाही तपास अधिकारी करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांना बळी पडू नये आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित आणि शांततापूर्ण उत्सवासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत, असे पोलिस यंत्रणांनी म्हटले आहे.

Related posts

फडणवीसांचे चॅलेंज सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी स्वीकारले

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर

सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला?;  सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना  सवाल