heavy rain alert in Gurugram: यमुना धोकापातळीवर; दिल्लीला पुन्हा इशारा

heavy rain alert in Gurugram

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे यमुना नदी धोकापातळीवर वाहत आहे. अशातच हवामान विभागाने दिल्लीच्या काही भागासह गुरुग्राम, फरिदाबाद, यमुनानगर, मेवात, पलवल, रेवाडी आणि महेंद्रगड येथे मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाचा इशारा दिला आहे. (heavy rain alert in Gurugram)

शुक्रवारी सकाळी १०.४० च्या सुमारास संदेशात म्हटले आहे की, पुढील तीन तासांत फरीदाबाद, गुरुग्राम आणि हरियाणातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गुरुग्राम आणि फरीदाबाद व्यतिरिक्त, झज्जर, जिंद, कर्नाल, कुरुक्षेत्र आणि इतर अनेक शहरांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.(heavy rain alert in Gurugram)

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) एसएमएसद्वारे जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, ‘‘पुढील ३ तासांत फरीदाबाद, गुरुग्राम, झज्जर, जिंद, कर्नाल, कुरुक्षेत्र, नूह, पलवल, पानीपत, रेवाडी, रोहतक, सोनीपत, यमुनानगर येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे.’’

चंदीगड भारतीय हवामान विभागा (आयएमडी)च्या मते, जिल्हावार इशाऱ्यांमध्ये गुरुग्राम, फरीदाबाद, यमुनानगर, मेवात, पलवल, रेवाडी आणि महेंद्रगड येथे मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळ आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.(heavy rain alert in Gurugram)

याव्यतिरिक्त, दिल्लीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले की, पुढील दोन तासांत हरियाणातील कर्नाल, राजौंड, असांध, सफिदोन, जिंद, पानिपत आणि गोहाना, उत्तर प्रदेशातील शामली, मुझफ्फरनगर, कांधला आणि खतौली आणि राजस्थानातील राजगड येथे हलका अधूनमधून पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत, सततच्या पावसामुळे गुरुग्राममधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत, अनेक भाग पावसाच्या पाण्यात बुडाले आहेत. जिल्ह्यातील अनेक कार्यालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश जारी केले आहेत, तर शाळांनी यापूर्वी प्रशासनाला ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले होते.

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

एनसीडीसी ने सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले