ही निवडणूक महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची : योगी आदित्यनाथ

कोल्हापूर : प्रतिनिधी : निवडणूक केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची आहे. एक भारत श्रेष्ठ भारतासाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे कोणतीही नीती, नैतिकता नसलेली आघाडी देशाच्या बरोबर धोका करत आहे. देशाबरोबर धोका देण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. काँग्रेसमुळे देशाचे विभाजन झाले, अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तपोवन येथे सभा पार पडली. यावेळी बोलताना योगी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, पाकिस्तानचे अतिरेकी २०१४ च्या आधी देशात कधीही घुसायचे. देशाअंतर्गत आतमध्ये हल्ले व्हायचे. आम्ही त्यावर संसदेत आवाज उठवायचे त्यावेळी काँग्रेस आम्हाला पाकिस्तानबरोबर संबंध खराब होतील म्हणून विरोध करत होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हे सर्व हल्ले बंद झाले.

योगी म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे यांचं घर निजामानी जाळलं होतं. यात खर्गे यांचं कुटुंब जाळलं होतं. मी ज्यावेळी बटेंगे तो कंटेंगे म्हटल्यावर खर्गे यांना राग येतो. खर्गेजी, लोकांना खरा इतिहास सांगा, निजाम कोण होता, असे योगींनी आव्हान दिले.

महाविकास आघाडी ही एकमेकांना पराभवासाठी काम करत आहे. ते आधी एकमेकांना धोका देतील, नंतर हिंदूंना धोका देतील अन् देशाला धोका देतील. कॉंग्रेसला देशाशी काहीही देणं-घेणं नाही, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या मूल्यांना बाजूला करून काँग्रेसबरोबर आघाडी केली. महायुती सरकार आलं की विशाळगड अतिक्रमण आपोआप निघतं. हम बटे थे तब अपमान सहन करना पडता था! अयोध्येमध्ये काँग्रेस देखील राम मंदिर बांधू शकलं असतं, पण त्यांनी बांधलं नाही, अशी टीका करून ते म्हणाले, ५०० वर्षांचे स्वप्न पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर साकार झाले.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, उमेदवार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने यांच्यासह माजी आमदार जयश्री जाधव, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, भाजप जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, सुजित चव्हाण, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंवर टीका

खासदार धनंजय महाडिक यांनी फुलेवाडी येथील लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्याचा समाचार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यावर खासदार महाडिक यांनी, माझ्या केसाच्या भांगालाही धक्का लावणारा जन्माला यायचा आहे, असे प्रत्युत्तर दिले.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी