Thackeray brothers’ discussion : ठाकरे बंधूंच्या अडीच तास चर्चेत काय ठरलं?

Thackeray brothers' discussion

मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलन, गणेशोत्सव आणि उप राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थावर भेट घेतल्याने चर्चांना ऊत आला आहे.  या भेटीत दोघां भावांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोघां भावांनी रणशिंग फुंकले असून दसरा मेळाव्यात शिवसेना मनसे युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आणि मनसे यांची युती झाली तर शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?  असा प्रश्न विचारला जात आहे. (Thackeray brothers’ discussion)

शिवसेना आणि मनसे यांच्यातील अबोला संपला असून उद्धव आणि राज यांच्यातील भेटी वाढल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात तीन ते चार वेळा भेट झाल्या आहेत. या भेटीपूर्वी दोन दिवसापूर्वी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याने महाविकास आघाडीचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास शिवतीर्थावर पोहोचले. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत होते. दोघां भावांमध्ये अडीच तास चर्चा झाली. पण चर्चेत काय घडले हे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेले नाही. राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या मावशींना भेटायला गेले होते, असा खुलास खासदार राऊत यांनी केला आहे. पण त्यांचा खुलासा पटण्याजोगा नसल्याने ही राजकीय भेट होती असे जाणकारांचे म्हणणे होते. (Thackeray brothers’ discussion)

बैठकीत मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, कंडोमपा, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक महानगरपालिकेतील युतीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. सध्या शिवसेना उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असल्याने शिवसेना मनसे युती झाली तर त्याबाबतच्या रणनितीबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा दोन ऑक्टोबरला होणार असल्याने या मेळाव्यासाठी आमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गेले असावेत अशी शक्यताही वर्तवली जात आहे. मनसेचा मविआमध्ये समावेश होऊ शकते का? याची चाचपणीही झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपला कसे रोखायचे?, कोणत्या मुद्दयावर निवडणूक लढवायची? यावर प्राथमिक चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला शिवसेना आणि मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते अशी माहिती पुढे आली आहे. (Thackeray brothers’ discussion)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर