नवी दिल्ली : छत्तीसगडच्या शक्ती जिल्ह्यातील वेदांत लिमिटेडच्या वीज प्रकल्पात बॉयलरचा प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात किमान १० कामगार ठार झाले असून २३ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी शोक व्यक्त केला आहे.
शक्ती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमित तोपनो यांनी वीज प्रकल्पात झालेल्या अपघातात झाल्याचे सांगितले. शक्तीचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी नऊ कामगार ठार आणि १५ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे. स्फोटानंतर तात्काळ स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली बचाव कार्यास सुरुवात केली. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. (Ten workers killed in boiler explosion at Vedanta power plant)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी तीन कामगारांचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेतील सात कामगारांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. परिसरात प्रचंड उष्णता असल्याने कामगार आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
प्लांट व्यवस्थापनाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या सिंगितराई प्लांटमधील एका बॉयलर युनिटमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये आमचे उप-कंत्राटदार, एनजीएसएल (एनटीपीसी जीई पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड) यांचे कर्मचारी सामील होते. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय मदत आणि उपचार सुनिश्चित करणे हे त्यांचे तात्काळ प्राधान्य आहे आणि ते वैद्यकीय पथके व स्थानिक प्रशासनाशी जवळून समन्वय साधत आहेत. “आम्ही तपशील मिळवण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि आमच्या भागीदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे,” (Ten workers killed in boiler explosion at Vedanta power plant)