भ्रष्टाचारी परमबीर सिंग यांची सखोल चौकशी करा ; अनिल देशमुख यांची मागणी

Demand for a thorough investigation of Parambir Singh

जमीर काझी : मुंबई : वादग्रस्त मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लिलावती रुग्णालयातील घोटाळ्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केली.

परमबीर सिंग यांचे खरे चारित्र्य जनतेसमोर

भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपामुळे परमबीर सिंग यांना लिलावती हॉस्पिटलच्या संचालक पदावरून गेल्या आठवड्यात हटविण्यात आले आहे. त्याबाबत अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ते म्हणाले, “मी गृहमंत्री असताना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचं षडयंत्र परमबीर सिंग यांनी रचले होते. आता त्यांचे भ्रष्टाचाराचे कारनामे एकामागून एक समोर येत असून मुंबईतील प्रख्यात लिलावती रुग्णालय प्रशासनानं त्यांना अपमानास्पद पद्धतीने पदावरून काढून टाकल्याने त्यांचे खरे चारित्र्य जनतेसमोर आले आहे. त्यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. (Demand for a thorough investigation of Parambir Singh)

डॉक्टरांच्या बढतीसाठी २५ लाख रुपयांची लाच मागितली

लिलावती रुग्णालयातील ट्रस्टी आणि डॉक्टरांनी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. असे सांगून अनिल देशमुख म्हणाले, मला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी रुग्णालयातील अनेक डॉक्टरांकडून बढतीसाठी प्रत्येकी सुमारे २५ लाख रुपयांची लाच मागितली व वसूल करण्याचा उद्योग सुरू केला होता. या घोटाळ्यांमुळं तसेच गैरवर्तनाच्या तक्रारींमुळे रुग्णालय प्रशासनानं त्यांना पदावरून काढण्याचा निर्णय घेतला.” (Demand for a thorough investigation of Parambir Singh)

अँटिलया प्रकरणाचे प्रमुख सुत्रधार परमबीर सिंग

अनिल देशमुख पुढं म्हणाले की, “मी गृहमंत्री असताना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब आढळल्याच्या घटनेत परमबीर सिंग सरकारची दिशाभूल करत होते. तपासावर संशय आल्याने हा तपास त्यांच्या हातातून काढून दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला. तसेच एटीएसच्या तपासात परमबीर सिंग हे या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे गंभीर संकेत मिळाले. त्यामुळे त्यांची कमी महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे खोटे आरोप केले. मात्र, हे आरोप झाल्यानंतर मी स्वतः चौकशीची मागणी केली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली; मात्र वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंग हजर झाले नाहीत. अटकेच्या भीतीने ते फरार झाले आणि नंतर वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर करून माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचं मान्य केले होते. आता लिलावती रुग्णालयातील कारनाम्यांमुळं त्यांच्या भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा पुन्हा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी देशमुख यांनी केली. (Demand for a thorough investigation of Parambir Singh)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर