T Shirt Movement : राहुल गांधींची ‘व्हाईट टी शर्ट मुव्हमेंट’

T Shirt Movement

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ‘व्हाईट टी शर्ट’ आंदोलन सुरू केले आहे. गरीब आणि कामगार वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी सामूहिक कृतीद्वारे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ‘व्हाईट टी शर्ट’ चळवळ सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भांडवलदारांना समृद्ध करण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे विषमता वाढली आहे. गरीब, कामगार आणि कष्टकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. (T Shirt Movement)

राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्टवर म्हटले आहे, ‘मोदी सरकारने निवडक लोक आणि भांडवलदारांना फायदा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गरीब आणि कामगारवर्गाकडे पाठ फिरवली आहे. त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. निवडक भांडवलदारांना समृद्ध करण्यासाठी सरकारने संपूर्ण लक्ष केंद्रित केली आहे. त्यामुळे विषमता वाढली आहे. देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या कामगारांचे हाल होत आहेत. त्यांना अनेक प्रकारचा अन्याय आणि अत्याचार सहन करावा लागत आहे. त्यांना न्याय्य आणि हक्क मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे आवाज उठवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी ‘व्हाईट शर्ट मुव्हमेट’ सुरू करत आहोत.’(T Shirt Movement)

देशातील तरुणांना आणि कामगार वर्गाच्या सहानुभूतीदारांना या चळवळीत मोठ्या उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

काय आहे व्हाईट टी शर्ट मुव्हमेंट

व्हाईट टी शर्ट मुव्हमेंटच्या वेबसाईटनुसार, पांढरा टी शर्ट फक्त साध्या राहणीचे प्रतिनिधीत्व करतो. करुणा, एकता, अहिंसा, समानता आणि प्रत्येकाचा विकास हे या चळवळीचे प्रतिक आहे. ही मूल्ये सुसंवाद आणि विविधतेवर आधारित भारताची आठ हजार वर्षे जुन्या संस्कृती अधारेखित करतात. आज वाढत्या विषमतेचे मूळ उत्पन्न, जात आणि धर्म यांमध्ये आहे. या विचारसरणीपलीकडे जाऊन कृती करण्याची गरज आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपण सर्वजण बदलाचे सहकारी बनू आणि या जीवनपद्धतीचा अभिमानाने स्वीकार करुया. पांढरा टी शर्ट हे आमचे प्रतिक आहे. एक न्याय, एकसंध भारत आणि समान राष्ट्र निर्माण करणे हे भारत जोडो यात्रेचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा :
काळा कायदा दमन करणारा

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !