Shri Jotiba : जोतिबाच्या मूर्तीवर रासायनिक प्रकिया

Shri Jotiba

कोल्हापूर : प्रतिनिधी : दख्खनचा राजा देव जोतिबा मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रकिया करण्यात येणार आहे. २१ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत प्रकिया करण्यात येणार असून चार दिवस मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाविकांना चार दिवस फक्त उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. (Shri Jotiba)

वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा जि. कोल्हापूर)  येथील जोतिबाची मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करण्याकामी वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळवले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली व पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडून मूर्तीची पाहणी करणेत आली होती व मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल देण्यात आला.(Shri Jotiba)

या अहवालाच्या अनुषंगाने देवस्थान व्यवस्थापन समितीने  मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी  महासंचालक, भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांना तीन जानेवारीला पत्र पाठवून कळविले होते. त्यानुसार १७ जानेवारी रोजी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर पुरातत्व विभागाचे  वरिष्ठ अधिकारी, देवस्थान समिती, मंदिराचे पुजारी यांच्याशी चर्चा करुन जोतिबा मूर्तीवर रासायनिक संर्वधन प्रक्रिया मंगळवारी, २१जानेवारीपासून शुक्रवारी २४ जानेवारीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चार दिवस जोतिबा मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. चार दिवसाच्या कालावधीमध्ये भाविकांसाठी जोतिबा देवाची उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी मंदिरातील कासव चौकात ठेवणेत येणार आहे. भाविकांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.(Shri Jotiba)

हेही वाचा :
युद्धभूमीचे पर्यटन घडणार

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक