बारामती : प्रतिनिधी : माझे दु:ख मोठे आहे. माझे तर सर्वस्व हरवले आहे. पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यावर दादांचे स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुम्हा सर्वांच्या आधारावर चालण्याचा निर्धार केला आहे, अशी भाविनक साद सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या सांगता प्रचार सभेत बोलताना त्यांना आश्रू अनावर झाले.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक गुरुवारी २३ रोजी होत आहे. बारामतीतील शारदा प्रतिष्ठान येथे प्रचार सांगता सभा झाली. सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, उदय सामंत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, यांच्यासह महायुतीचे मंत्री, आमदार यांची प्रमुख उपस्थिती होती. (Sunetra Pawar’s emotional appeal to the people of Baramati)
संघर्षयोद्ध्याची सहचारिणी
सुनेत्रा पवार म्हणाल्या, मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. येसूबाई, अहिल्याबाई जशा लढल्या त्याप्रमाणे मी तुमची सेवा करेल. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचे मी काम करेन. बारामतीकर कुटुंब मानून मी पुढे काम करेन. मी थांबणार नाही, खचणार नाही आणि हटणार नाही. बारामतीची माणसे हीच माझी खरी ताकद आहे, असेही त्या म्हणाल्या. (Sunetra Pawar’s emotional appeal to the people of Baramati)
बारामतीने रेकॉर्ड करुन दाखवावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या स्मृतींना आहुती दिली नाही तर आपण करंटे ठरू असे म्हणत अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवारांसाठी रेकॉर्ड बारामतीकरांना करुन दाखवायचा आहे. बारामतीकरांनी भरघोस मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाविकास आघाडी सुनेत्रा पवारांच्या मागे
आपला भाऊ आपल्यात नाही, हे आयुष्यभर आपल्या मनात राहत. हा कार्यक्रम दुःखाचा आहे, सुनेत्रा वाहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्यावर अचानक पडलेली जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. महाविकासआघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोठ्या ताकदीने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे उभे राहणार आहे,” असा शब्द खासदार सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिला. सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.