सुनेत्रा पवार पुणे, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री

Sunetra Pawar is the Guardian Minister of Pune and Beed districts

जमीर काझी : मुंबई  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातातील मृत्यूनंतर त्यांचे पद सांभाळणाऱ्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. राज्य सरकारकडून मंगळवारी त्याबाबतचे आदेश काढण्यात आले.

अजित पवार यांचे गेल्या बुधवारी दुर्दैवाने निधन झाले. त्यानंतर चौथ्याच दिवशी पक्षाने सुनेत्रा पवार यांची गटनेते पदी निवड केल्यानंतर त्याचदिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित दादा यांच्याकडे जी महत्वाची खाती होती त्यातील सर्वात महत्वाचे अर्थ खाते वगळता राज्य उत्पादन शुल्क व क्रीडा कल्याण खाते त्यांना देण्यात आले होते. आता ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद संभाळत होते. त्या पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवली आहे. (Sunetra Pawar is the Guardian Minister of Pune and Beed districts)

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे बदनाम झालेल्या धनंजय मुंडे यांना गेल्यावर्षी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर दादांनी बीडचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवलं होते. तसेच सुनेत्रा पवार यांच्याकडे दोन्ही जिल्हे सोपविण्यात आले आहेत. (Sunetra Pawar is the Guardian Minister of Pune and Beed districts)

 पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?

पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. पक्षातील आमदार तसेच सर्व सेलच्या अध्यक्षांनी सुनेत्रा पवार यांच्याकडेच ही जबाबदारी सोपविण्याची मागणी केली आहे. ३० आमदारांनी सुनेत्रा पवार यांनाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे, अशा मागणीचे पत्र तयार केले आहे. (Sunetra Pawar is the Guardian Minister of Pune and Beed districts)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर