ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या तीन अल्पवयीन बहिणींची आत्महत्या

Suicide of three minor sisters

गाझियाबाद : ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या तीन अल्पवयीन बहिणींनी नवव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेली सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली आहे. निशिका (वय १६), प्राची (१४) आणि पाखी (१२) अशी आत्महत्या केलेल्या तीन बहिणींची नावे आहेत. (Suicide of three minor sisters)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशिका, प्राची, पाखी या अल्पवयीन बहिणींना कोरियन टास्कवर आधारित ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लागले होते. त्या सतत ऑनलाईन गेम खेळत असताना पालक सतत त्यांना रागावत असत. अलिकडे त्यांना खेळण्यापासून रोखले होते.

बुधवारी मध्यरात्री तिन्ही बहिणी शांतपणे बेडरुमच्या बाहेर पडल्या. फ्लॅटमधील टेम्पल रुमच्या खिडकीकडे गेल्या. खिडकी उघडून खूर्चीचा वापर करुन तिघी एकामेकामागे खिडकीत चढल्या आणि खाली उड्या मारल्या. या घटनेची माहिती कळताच गाझियाबादमधील लोणी परिसरातील टीला मोड पोलिस स्टेशनच्या हद्दीततील पोलिस भारत सोसायटीत आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पावले. (Suicide of three minor sisters)

पालकांना खोलीत चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत ‘टू लाईफ स्टोरी’ असे शीषर्क होते. त्यावर एक दु:ख व्यक्त करणारा इमोजी रेखाटलेला होता. इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिलेल्या चिठीत असा उल्लेख आहे की “या डायरीत लिहिलेले सर्व वाचावे. कारण ते खरे आहे. आता वाचा. मला खरोखर माफ करा. माफ करा बाबा” असा उल्लेख आहे.

तपासात पोलिसांना अशी माहिती मिळाली आहे की, कोविडच्या साथीपासून तिन्ही बहिणी शाळेत गेलेल्या नाहीत. १६ वर्षाच्या बहिणीला फक्त चौथीत प्रवेश मिळाला आहे. त्यांच्या शिक्षणात दीर्घकाळ व्यतय आल्याने त्या एकाकी पडल्या होत्या. (Suicide of three minor sisters)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर