Special Issue: आंबेडकर जयंती विशेषांकाचे प्रकाशन

Special Issue

कोल्हापूर : प्रतिनिधी : बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक बिंदू चौकात या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. (Special Issue)

कोल्हापूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे यांच्याहस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यास विशेषांकाचे संपादक आणि बहुजन ऐक्य चळवळीचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे व आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (Special Issue)

भारतातील राजकारण आणि आंबेडकरी राजकारणाचा वेध  अंकात घेण्यात आला आहे. तसेच विशेषांकात छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणानुबंधाविषयी लेखिका प्रज्ञा कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या कवितेचाही समावेश अंकात करण्यात आला आहे.

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक