Gokul Milk : दूध उत्पादकांना मिळणार १३६ कोटी अंतिम दूध दर फरक

Gokul Milk

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून  (गोकुळ) दूध उत्पादकांना १३६ कोटी दूध दर फरकाची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम  दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा होणार आहे अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. (Gokul Milk)

गोकुळच्या दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळीला अंतिम दूध दर फरक, हिरक महोत्सवी दरफरक २० पैसे प्रती लिटर, दूध फरकावरील व्याज, डिबेंचर्स व्याज, डिव्हिडंड अशी १३६ कोटी ०३ लाख रुपये इतकी रक्कम दूध संस्थेंच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. हि रक्कम गतवर्षी देण्यात आलेल्या दूध दर फरकाच्या रक्कमेपेक्षा २२ कोटी ३७ लाख इतकी जास्त आहे. तसेच १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत दूध उत्पादकांना पशुखाद्यासोबत फर्टीमिन प्लस मिनरल मिक्स्चरच्या ४ लाख ७३ हजार ५४२ इतक्या बॅग्ज मोफत देण्यात आल्या असून त्याची किंमत ७ कोटी १० लाख ३१ हजार ३०० इतकी होते.याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही दोन टक्के जादा बोनस देण्यात येणार आहे. अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली. (Gokul Milk)

          आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध उत्पादकांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. गतसालापेक्षा यावर्षी दूध उत्पादकांना प्रतिलिटर २० पैसे जादा दूध दर फरक मिळणार आहे. यामुळे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास सरासरी प्रतिलिटर (दर फरकासह) ६० रुपये ४८ पैसे तर गाय दूध उत्पादकास सरासरी प्रतिलिटर (दर फरकासह) ३६ रुपये ८४ पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दरफरकासह मिळणार आहे. (Gokul Milk)

          गोकुळने दूध संकलनाचा १८ लाख ५८ हजार लिटरचा टप्पा ओलांडला असून दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात रमजान ईद सणानिमित्या २३ लाख ६३ हजार लिटरची विक्रमी दूध विक्री केली आहे.(Gokul Milk)

·     अंतिम दूध दर फरक, दूध फरकावरील व्याज, डिबेंचर्सव्याज, डिव्हिडंड (वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनुसार) व्याज इ.रक्कम   –    रुपये  १२४.३९ कोटी

·     प्रतिलिटर २० पैसे प्रमाणे जादा रक्कम               –     रुपये ११.६४ कोटी

·       एकूण रक्कम                                              –      रुपये १३६.०३ कोटी

·       मोफत फर्टीमिन प्लस पशुखाद्यासोबत रक्कम      –      रुपये ७.१० कोटी

·       कर्मचाऱ्यांना २% हिरक महोत्सवी जादा बोनस रक्कम   –       रुपये १.८३ कोटी 

हेही वाचा :

 कोल्हापुरातील लॉटरीच्या तिकीटाला ५० लाखाचे बक्षिस

प्राचार्याच्या डोक्यातील शेणाचा प्रयोग

Related posts

एनसीडीसी ने सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले

बाजारात दर पाडून हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?