SP Yogesh Kumar Gupta : डॉल्बी वाजवणाऱ्या ३२७ मंडळावर गुन्हे दाखल होणार

SP Yogesh Kumar Gupta

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेश आगमनाच्या मिरवणूकीत कर्णकर्कश आणि मोठ्या आवाजात डॉल्बी साउंड सिस्टीम वाजवून ध्वनी प्रदुषणाचे उल्लंघन करणाऱ्या ३२८ मंडळावर खटले दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलिस अधिकारी आणि गणेश उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन मिरवणुकीतही ध्वनी मर्यादेचे उल्लेंघटन करणाऱ्या मंडळावरही कारवाई होणार असल्याचे पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी स्पष्ट केले. (SP Yogesh Kumar Gupta)

गणेशोत्सवासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला डीवायएसपी, पोलिस निरीक्षक यांच्यासह एलसीबीचे प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर शहर आणि परिसरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी गणेश आगमन मिरवणूकीत ध्वनी पातळी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ३२७ मंडळावर खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूकीतही ध्वनी क्षमतेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळे, डी.जे.सिस्टीमचे मालक, चालकांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोणत्याही डी.जे. सिस्टीम मालकांनी प्रेशर मिड तंत्राचा वापर करु नये असे आदेश दिले. तसेच तसेच डी.जे.समोर नाचताना सीओटू गॅसचा वापर करु नये, ट्रॅक्टरच्या बॉनेटवर नाचण्यासाठी बेस तयार करु नये अशा सूचना देण्यात आल्या. सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाविराधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. (SP Yogesh Kumar Gupta)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेश मूर्तींचे विसर्जन नदी, तलाव, विहिरीमध्ये न करता प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या कुत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन केले. नदी, तलावात विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. (SP Yogesh Kumar Gupta)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या