SP Yogesh Gupta : गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमणे हटवा : पोलिस अधीक्षक गुप्ता यांचे आदेश

SP Yogesh Gupta

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहतूक समस्येचा आढावा आज जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयात जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता  आणि महानगरपालिका प्रशासनक के. मंजुलक्ष्मी यांच्या  प्रमुख उपस्थित घेण्यात आला. गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमणे महानगरपालिका आणि शहर वाहतूक विभागाने समन्यवयाने काम करत हटवावीत असा आदेश पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी यावेळी दिले . (SP Yogesh Gupta)

            वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी शहरातील वाहतूक व पार्किंग संदर्भातील समस्यांचा स्लाइडशोद्वारे सविस्तर माहिती सादर केला. या बैठकीत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्यांवर झेब्रॉ क्रॉसिंग पट्टे, साईड व रस्त्यामध्ये पट्टे मारण्याची मागणी वाहतूक विभागाकडून करण्यात आली. तसेच संभाव्य गर्दीच्या ठिकाणी अतिक्रमण हटवून गर्दी टाळण्यासाठी शहर वाहतूक विभाग व महापालिका अतिक्रमण विभाग यांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी दिले. (SP Yogesh Gupta)

            कावळा नाका येथे लक्झरी बसस्थानक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेथे लाईटची, टॉयलेटची व बंद गाळे भाड्याने देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियंत्यांना दिल्या. सीएसआर फंडातून पार्किंगचे बोर्ड तयार करावेत. तसेच शहरातील सर्व सिग्नल सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक सिग्नलला बॅकअप वीजपुरवठा देणेच्या सूचना दिल्या. अनाधिकृत खाऊ गल्लीमुळे पार्किंगला अडथळा होत असेल तर तेथे कारवाई करण्याचे आदेशही आयुक्त मंजुलक्ष्मी यांनी दिले.  शहरातील वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी व आवश्यक उपकरणे उभारणीसाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. (SP Yogesh Gupta)

           बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, मनपा इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, प्रकल्प अभियंता सुरेश पाटील व वाहतूक सल्लागार जय रेवणकर उपस्थित होते. (SP Yogesh Gupta)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर