Sonam Wangchuk arrested: सोनम वांगचुक यांना अटक

Sonam Wangchuk arrested

नवी दिल्ली : लडाखमध्ये या दशकांमधील सर्वांत मोठा हिंसाचार झाल्यानंतर दोन दिवसांनी लडाख पोलिसांनी शुक्रवारी (२६ सप्टेंबर) पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली. लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी झालेल्या निषेधावेळी हिंसाचार उफाळून आला होता. त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. (Sonam Wangchuk arrested)

गुरुवारी, केंद्रीय गृह मंत्रालयाने कथित उल्लंघनांमुळे त्यांच्या एनजीओचा परवाना परवाना रद्द केला.

वांगचुक यांनी केलेल्या ‘प्रक्षोभक’ भाषणामुळे जमावाने हिंसाचार केला. त्यातून अरब स्प्रिंगसारखा निषेध आणि नेपाळमधील जनरल झेडसारखी उग्र निदर्शने झाली. त्यात अपरिमीत हानी झाल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

तथापि, वांगचुक यांनी या आरोपाचा इन्कार करत सरकार त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी खटला रचत असल्याचा आरोप केला. (Sonam Wangchuk arrested)

केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केल्यानंतर गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील लडाखच्या विद्यार्थी शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे (SECMOL) परकीय योगदान (नियमन) कायदा प्रमाणपत्र (FCRA) गुरुवारी रद्द केले. (Sonam Wangchuk arrested)

SECMOL ने FCRA च्या कलम ८, १२, १७, १८ आणि १९ चे उल्लंघन करून परदेशी देणग्या मिळवल्या. मंत्रालयाने आरोप केला आहे की आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये, सोनम वांगचुक यांनी कलम १७ चे उल्लंघन करून SECMOL च्या FCRA खात्यात ३.३५ लाख रुपये जमा केले. दुसरीकडे, ही रक्कम FCRA निधीतून खरेदी केलेल्या जुन्या बसच्या विक्रीतून मिळवलेली रक्कम होती आणि अशा प्रकारे योग्यरित्या FCRA खात्यात जमा केली गेली, असा असोसिएशनने दावा केला आहे.
सोनम वांगचुक यांनी स्थापन केलेल्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख (HIAL) लाही FCRA नोंदणीशिवाय १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय पैसे मिळाले असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप