Critical Operation : पोटातून काढले २९ चमचे, १९ टूथ ब्रश

Critical Operation

मेरठ : रुग्णाला प्रचंड त्रास होतोय म्हणून त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अल्ट्रासाऊंड करण्यात आले. डॉक्टरनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे या ४० वर्षीय रुग्णाच्या पोटातून स्टीलचे २९ चमचे, १९ टूथब्रश आणि दोन धारदार पेन काढण्यात आले. या प्रकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. (Critical Operation)

संबंधित रुग्ण बुलंदशहर येथील रहिवासी आहे. तो विवाहीत आहे, त्याला दोन मुलेही आहे. या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाने एक महिन्यापूर्वी गाझियाबादमधील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. डॉक्टरांनी सांगितले की त्याला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. प्रकृती कमालीची बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात आणण्यात आले. (Critical Operation)

अल्ट्रासाऊंडमध्ये त्याच्या पोटात अनेक धातूच्या वस्तू आढळल्या. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. १७ सप्टेंबर रोजी ही शस्त्रक्रिया डॉ. श्याम कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

काढून टाकलेल्या वस्तूंची संख्या पाहून आमच्या टीमलाही धक्का बसला, असे ते म्हणाले. (Critical Operation)

“रुग्णाला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्याची प्रकृती आता स्थिर आहे आणि सुधारत आहे,” असे ते म्हणाले. हे वर्तन मानसिक स्थितीशी संबंधित आहे ज्यामध्ये रुग्ण आवेगाने हानिकारक वस्तू गिळतात, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाने डॉक्टरांना सांगितले की, त्याने त्या वस्तू चिंताग्रस्त होऊन गिळल्या आहेत. “माझ्या कुटुंबाने मला डॉक्टरकडे नेले पण तिथेच सोडले,” तो म्हणाला. “त्यांनी तिथे माझ्याशी वाईट वागणूक दिली आणि अनेकदा मला जेवणही दिले नाही. मला असहाय्य आणि राग आला, म्हणून मी स्वतःला दुखवण्यासाठी गोष्टी गिळू लागलो,” तो पुढे म्हणाला.

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप