Shivsena-Congress : काँग्रेस नेते, उद्धव ठाकरे यांची भेट

Shivsena-Congress

मुंबई : महापालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा आगामी काही दिवसांत होऊ शकते. गणेशोत्सव आता संपला आहे. आता राजकीय हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वांत महत्त्वाची महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीगाठी काही दिवसांपूर्वीच झाल्या आहेत. (Shivsena-Congress)

या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी (८ सप्टेबर) काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतली. या नेत्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे समजते. चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. (Shivsena-Congress)

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार अमीन पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेसाठीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपले पत्ते अद्याप खुले केले नाहीत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर