शिवराय आणि जिजाऊंची बदनामी करणाऱ्या आरोपींकडून माफीनामा

Shivaji the Hindu King in Islamic India

सातारा : प्रतिनिधी :  ऑक्स्फर्ड युनिव्हरसिटी प्रेस इंडिया, प्रकाशित,  जेम्स लेन लिखित, “शिवाजी”, हिंदू किंग इन इस्लामिक इंडीया या पुस्तकात काही शेरे आणि परिच्छेदामधुन, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि मॉसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा मलीन करण्याचा जो मजकूर लिहीला होता.  त्याविरोधात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात २००४ मध्ये खाजगी फौजदारी याचिका दाखल केली होती. या गुन्ह्यातील आरोपींनी आपल्यावरील फौजदारी खटला चालवू नये, काढून टाकावा याकरीता मुंबई उच्य न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी दरम्यान आरोपींनी माफी मागण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार कोल्हापूर सर्कीट बेच यांचा आदेश पारित झाला असून, आरोपींनी माफीनामा लिहून दिला आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

जेम्स लेनच्या पुस्तकात बदनामी करणारा मजकूर

लेखक जेम्स लेन यांनी लिहिलेले “शिवाजी”  द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, या नावाचे पुस्तक २००३ मध्ये  ऑक्स्फर्ड युनिव्हरसिटी प्रेस इंडिया यांनी प्रकाशित केले होते. या पुस्तकातील परिच्छेद आणि समासांमध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि मॉसाहेब जिजाऊ यांचे प्रतिमा मलिन करणारा मजकूर होता. त्याशिवाय पुस्तकाचे नाव हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे सुध्दा बदनामीकारक होते. (Shivaji, the Hindu King in Islamic India)

उदयनराजे भोसलेकडून कोर्टात फौजदारी खटला

शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडीया हे पुस्तक प्रकाशित करुन, आरोपी क्रमांक १ ते १० यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मॉसाहेब जिजाऊ यांचेविषयी बदनामीकारक शेरे आणि टिपण्या प्रकाशित झाल्याने, त्यांच्या विरोधात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचेसमोर यांचेविरुध्द खाजगी फौजदारी खटला दाखल केला होता.

आरोपीकडून उच्च न्यायालयात याचिका

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी उदयनराजे भोसले यांची तक्रार आणि पुस्तकातील घटकांचा विचार करुन, आरोपींविरुध्द आयपीसी कलम ५०० नुसार कार्यवाही सुरु करण्याचे आदेश २ एप्रिल २००४ दिले. या आदेशाच्याविरोधात  आरोपींनी मुंबई उच्य न्यायालयात फौजदारी याचिका आणि अर्ज दाखल केला. सदरचे फौजदारी रिट पिटीशन हे सईद मंदार खान, संपादक, ऑक्स्फर्ड युनिव्हरसिटी प्रेस इंडिया  तसेच, टिळक महाराष्ट्र विदयापिठामध्ये संस्कृतचे प्राध्यापक  म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ.श्रीकांत बहुलेकर, तसेच टिळक महाराष्ट्र विदयापिठाच्या लेक्चरर सुचेता परांजपे, बीओआरआय चे ग्रंथपाल व्ही.एल.मंजूळ यांनी दाखल केली होती. (Shivaji, the Hindu King in Islamic India)

आरोपींनी दाखवली माफी मागण्याची तयारी

सदर याचिका संदर्भात  मुंबई उच्य न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील न्यायाधीश शिवकुमार दिगे यांचेसमोर १७ डिसेंबर २०२५ ला सुनावणी झाली.  या सुनावणी दरम्यान मुळ आरोपीं आणि याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी तक्रारदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माफी मागायची तयारी दर्शवली. तसेच लेखी माफीपत्राची मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात राष्ट्रीय पातळीवर व्यापक प्रसिघ्दी दिली जाईल असे सांगितले. तक्रारदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेवतीने ॲङ शैलेश धनंजय चव्हाण, ॲङ रणजीत पाटील, ॲङ धवलसिंह पाटील यांनी कोर्टाने आदेश दयावेत असे सांगितले. यावर न्यायमुर्ती श्री दिगे यांनी राष्ट्रीय पातळीवरील सर्वांत जास्त खपाच्या वृत्तपत्रात माफीनामा पत्र प्रसिध्द करण्याचे आदेश दिले. (Shivaji, the Hindu King in Islamic India)

माफीनामा पत्रामधील मजकूर असा

जेम्स विल्यम लेन्स यांनी लिहिलेले पुस्तक सन २००३ मध्ये ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी यांनी प्रकाशित केले. लक्षावधी लोकांच्या मनामध्ये आणि हृदयावर राज्य करणा-या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता मी ओळखतो. त्यांच्या विषयीच्या मनोभावना, त्यांचा वारसा याबाबत मी आदर व्यक्त करतो. त्यांना तसेच सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याबद्दल दिलगीरी व्यक्त केरतो. त्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल मी हा बिनशर्त माफीनामा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेकडे सादर करतो. (Shivaji, the Hindu King in Islamic India)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर