सापाला जंगलात सोडताना सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

Snake rescuer dies while releasing a snake into the forest

बेळगाव : प्रतिनिधी :  खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील सर्प मित्र  बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार ( ३९ ) यांचा सर्पदंशाने  दुर्दैवी मृत्यू झाला. सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी ते गेले असताना सापाने त्यांच्या हाताला दंश केल्याची घटना घडली. (Snake rescuer dies while releasing a snake into the forest)

बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार हे गेल्या सुमारे दहा वर्षांपासून साप पकडण्याचे काम करीत होते. कोणाच्याही घरात अथवा परिसरात साप आल्याची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी जाऊन सापाला सुरक्षितपणे पकडत असत. त्यानंतर पकडलेल्या सापाला पोत्यात ठेवून जंगलात नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम ते करीत होते. Snake rescuer dies while releasing a snake into the forest)

मंगळवारीही एका ठिकाणी साप पकडल्यानंतर तो जंगलात सोडण्यासाठी बडकू सुतार गेले होते. जंगलात पोहोचल्यानंतर सापाला सोडण्यासाठी त्यांनी पोत्याचे तोंड उघडले असता अचानक सापाने पलटी मारून त्यांच्या हाताला दंश केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साप जंगलात सोडण्यासाठी जाताना ते नेहमी कोणाला तरी सोबत घेऊन जात असत; मात्र यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नव्हते.

बराच वेळ होऊनही बडकू उर्फ सातेरी घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ते जंगल परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच   रुग्णवाहिका तातडीने बोलावून घेतली. रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी बेळगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. Snake rescuer dies while releasing a snake into the forest)

Related posts

निवडणूक आयुक्त ३०० खासदारांना का भेटत नाहीत; राहूल गांधींचा सवाल

वंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास आवश्यक : मेघराज राजेभोसले

दुष्काळामुळे राज्यात १० टक्के पाणीकपात लागू