जमीर काझी : मुंबई : आमचा लढा कोणत्याही एका पक्षाचा, व्यक्तीचा, जातपात व धर्माचा नाही, हा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. जर कोणी हुकूमशाह बनत असेल तर त्याला या देशातच आम्ही गाडून टाकण्यासाठी आम्ही उभे राहिलेलो आहोत,असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तर एसआरआय पद्धत रद्द करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हव्यात, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठणकावले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व ईव्हीएम मशीनच्या विरोधात पुकारलेल्या गर्जना मोर्चात ते बोलत होते. (Shiv Sena and MNS stage a protest against Gyanesh Kumar)
मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात ऊन्हाचा कडाका असतानाही हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी होते. मोर्चात निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार व पंतप्रधान मोदी अमित शहा यांच्या निषेधाची व्यंगात्मक फलक आणि घोषणांनी लक्ष वेधुन घेतले. मोर्चात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार विजय वडेडटीवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे , आमदार जयंत पाटील जितेंद्र आव्हाड, मेहबूब शेख, खासदार संजय राऊत, बाळा नांदगावकर, शेकापचे नेते जयंत पाटील आदी सहभागी होते. (Shiv Sena and MNS stage a protest against Gyanesh Kumar)
देशातील १३ कोटी मतदार वगळले
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ ज्ञानेश कुमारच्या भ्रष्ट पध्दतीमुळे राज्यातील दोन कोटी मतदार वगळले गेले. संपूर्ण देशात १३ कोटी मतदार अचानक या लोकांनी वगळून टाकले. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या यांनी देशाच्या मतदार यादीतून वगळून टाकली, तामिळनाडूमध्ये ७० लाख व बंगालमध्ये ३० लाख वगळले. विशेष म्हणजे बंगालमध्ये जे मतदार वगळले गेले, सार्वत्रिक निवडणुकीत त्यातले काही वैध झालेत. आता तिकडे पोटनिवडणूक आहे. या मतदारांना पोटनिवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून तात्काळ सुनावणीसाठी यांचे अर्ज सुप्रीम कोर्टात गेले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने तात्काळ उत्तर दिले की, ऐकू ना. ही निवडणूक परवा ६ तारखेला होत आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले, फक्त पोटनिवडणूक आहे, आम्ही ५ तारखेला सुनावणी घेऊ. उद्या सुनावणी घेणार आहे की नाही, अजूनदेखील ठरलेले नाही. जर निर्णय हो दिला, तर परवाच्या निवडणुकीत हे मतदार मतदान करू शकणार आहेत का? याचा अर्थ यांनी सर्व संस्था आपल्या सोबत घेतल्या आहेत. (Shiv Sena and MNS stage a protest against Gyanesh Kumar)
ज्ञानेश कुमार यांची नेमणूक ही पक्षपातीपणाने
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीलाच माझा आक्षेप आहे. भारतात राष्ट्रपतींची निवडणूक होते, पण निवडणूक आयुक्तांची निवडणूक होत नाही. यापूर्वी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होणाऱ्या कमिटीमध्ये सरन्यायाधीश होते, पंतप्रधान होते आणि विरोधी पक्षनेते होते. भाजपने कमिटीतून सरन्यायाधीश काढून टाकले, विरोधी पक्षनेता ठेवला आणि सरन्यायाधीशांच्या जागी पंतप्रधान म्हणतील तो मंत्री टाकला. म्हणजे कोण तर अमित शाह. राहुल गांधींनी असहमती दर्शवली. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत कोर्टात केस असल्याने राहूल गांधींनी थांबण्यास सांगितले होते पण हे ज्ञानेश्वर कुमारांना नेमून मोकळे झाले. कोर्टाच्या सुनावणीला अद्याप तारीख मिळत नाही. ज्ञानेश कुमार यांची नेमणूक ही पक्षपातीपणाने केली आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्ञानेश कुमार हे त्यांचे हत्यार आहे. आता मताधिकाराचा हक्क ही त्यांनी चोरला आहे. १३ कोटी मतदान तुम्ही अचानक वगळत आहात. बंगालमध्ये आतापर्यंत अवैध ठरलेल्या अर्जांची छाननी झाली, त्यातल्या काही लोकांना वैध ठरवले गेले आणि ती सुनावणी तिकडे सुरू आहे, पण उरलेल्या मतदारांची छाननी होऊन तो निकाल किंवा तपास पूर्ण व्हायला जवळपास १४६ महिने लागतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
राज ठाकरे म्हणाले,’ “देशात मतचोरी होते आहे मी २०१७ पासून सांगतोय. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, तृणमृल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. मी सतत सांगत होतो. मतांमध्ये चोरी होत आहे. त्यावेळी मी निवडणुकांवर बहिष्कार टाका, असं म्हणत होतो. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत महायुतीला मिळाले, पण महाराष्ट्रात जल्लोष नाही. लोकांमध्ये उत्साह नाही, जल्लोष नाही. संपूर्ण सन्नाटा होता, हा कोणता विजय? ६ महिन्यात ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. लोकसभा आणि विधानसभेत भाजपची कोटी मत वाढली. विधानसभेच्या वेळेला मतदार वाढवायचे आणि त्यातून सत्ता घ्यायची आणि एसआयआर मधून दोन कोटी मतदार वगळायचे. हे कोण लोक आहेत? कोणत्याही परिस्थितीत हे रद्द झाले पाहीजे आणि ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहीजे. माझ्या फक्त दोनच मागण्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे, महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो रद्द करावा. तसेच दुसरी मागणी म्हणजे ,यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे., असे त्यांनी ठणकावून सांगितले. (Shiv Sena and MNS stage a protest against Gyanesh Kumar)