Shirsat got angry: निधीची पळवापळवी, शिरसाट संतापले!

Shirsat got angry

छत्रपती संभाजीनगर : माझ्या विभागाचा निधी वर्ग करता येत नाही, कमीही करता येत नाही. या विभागाचा निधी मनमानीपद्धतीने वळवण्यात येत असेल तर सामाजिक न्याय खाते ठेवताच कशाला?, ते बंदच करून टाका, असा संताप सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटी यांनी बोलून दाखवला. यावेळी त्यांनी अर्थखात्यावर जोरदार टीका केली. (Shirsat got angry)

ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी माझा निधी वर्ग केला असेल तर ते मला माहीत नाही. अर्थ विभागाकडून अक्षरश: मनमानी सुरू आहे. मी या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. माझ्या खात्याचा निधी कमी करणे किंवा वर्ग करणे बेकायदा आहे. अर्थखात्याला वाटेल तेव्हा ते वाटेल तसे वागत असेल ते चुकीचे आहे, याला माझा पूर्ण विरोध आहे. आता हे सहन करण्यापलीकडे गेले आहे. सहन करण्याचीही एक मर्यादा असते. यानंतरही तुम्ही जास्त करत असाल तर सरळ सगळाच निधी कट करून टाका, अशी उद्विगनताही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.(Shirsat got angry)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. या दोन्ही विभागांचे अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केल्याचे समजते. यानंतर आता संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

पत्रकारांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला आहे काय, असे विचारले असता शिरसाट यांनी त्याबद्दल माहिती नाही, आणि तसे असेल तर बरोबर नाही, अशी प्रतिक्रीया दिली.(Shirsat got angry)

आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झाले आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का? हे मला  पटलेले नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

  • यावर्षीच्या अर्थसंकल्पात सामाजिक न्यायसाठी केलेली तरतूद
  • अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २२ हजार ६५८ कोटी
  • अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी
  • यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागासाठी सहायक अनुदान म्हणून ३ हजार ९६० कोटी
  • आदिवासी विकास खात्यासाठी ३ हजार ४२० कोटींचे सहायक अनुदान

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला