Shinde’s files will go to Fadnavis : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या फाईल्स जाणार फडणवीसांकडे

Shinde's files will go to Fadnavis

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातील फाईल्स आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत. नगरविकास खात्यावर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. यापुढे नगरविकास खात्यातून मोठ्या रक्कमेचा निधी वितरीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. (Shinde’s files will go to Fadnavis)

महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उप मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वय वरुन दिसत असला तरी निधी वाटपावरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या आमदारांमध्ये कुरबुरी सुरू असतात. अर्थमंत्री अजित पवारांना तर निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप सातत्याने होता. आता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यामधून फक्त शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांना हवा तितका निधी मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मोठ्या निधीच्या फाईल्स शिंदे यांच्याकडून यापुढे फडणवीसांकडे जाणार आहेत. (Shinde’s files will go to Fadnavis)

नगरविकास खात्याकडून राज्यभरात अनेक योजना सुरू आहेत. या योजनांकरिता मोठा निधी द्यावा लागतो. यापुढे जर कोणत्याही आमदार किंवा नगरसेवकाला मोठ्या रक्कमेचा निधी हवा असेल तर त्या निधीशी संबधित फाईल पहिल्यांदा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल. त्यानंतर ती फाईल फडणवीसांकडे जाणार आहे. ही फाईल फडणवीसांच्या नजरेखालून गेल्यानंतर निधीला परवानगी दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यांनी घेतलेला निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी करण्यात आला अशी चर्चा आहे. हा निर्णय शिंदेना कितपत पचनी पडणार हे यापुढे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास खात्याकडून शहरी भागांसाठी मोठ्या प्रमाणात निधीवाटप होण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षात योग्यप्रकारे निधी वितरीत होतो को नाही यावर फडणवीसांची नजर राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत महायुतीत कोणताही वाद होऊ नये यासाठी फडणवीसांनी शिंदेंच्या नगरविकास खात्यावर अंकुश ठेवला जाणार आहे. (Shinde’s files will go to Fadnavis)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर