कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम अनुवादक, कवी व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ लेखक प्रा.राजन गवस यांच्या हस्ते दिला जाणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. (डॉ). सुरेश गोसावी हे असतील. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५१ हजार रुपये व सन्मान चिन्ह असे आहे. (Senior critic Chandrakant Patil receives award)
प्रा. चंद्रकांत पाटील यांची समीक्षा ही मराठीतील महत्त्वाची समीक्षा आहे. सर्जनशील लेखनाबरोबरच त्यांनी अनुवाद व समीक्षा या प्रकारात महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या लेखनाचे स्वरूप हे द्वैभाषिक स्वरूपाचे आहे. मराठी कविता भारतीय स्तरावर नेण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मराठी हिंदीतील सांस्कृतिक अनुबंध अधिक विकसित करण्यामध्ये प्रा. पाटील यांचे लेखन महत्त्वाचे ठरले आहे. ‘आणि म्हणूनच’ ‘आणि तोपर्यंत‘ व ‘कवितेसमक्ष’ हे त्यांचे महत्त्वाचे समीक्षा ग्रंथ होत. त्यांची संपादने महत्त्वाची होते. विश्लेषक स्वरूपाची समीक्षा असे पाटील यांच्या समीक्षेचे स्वरूप आहे. (Senior critic Chandrakant Patil receives award)
१९६० नंतरच्या आधुनिक मराठी साहित्याचा पुरस्कार करण्यामध्ये प्रा.पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. भीष्म सहनी यांच्या ‘तमस’ या कादंबरीचा मराठी अनुवाद साठोत्तरी काळातील मराठी-हिंदी साहित्याचे विशेषतः कवितेचे महत्त्वाचे टिकाकार आणि समीक्षक. १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमातून केलेले लेखन हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. मराठी व हिंदी साहित्याचा दुवा म्हणून प्रा. चंद्रकांत पाटील यांचे महत्त्वाचे काम करीत आहे. आजवरच्या त्यांच्या एकंदर समीक्षा कारकीर्दीचा सन्मान म्हणून या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. (Senior critic Chandrakant Patil receives award)
या पुरस्काराच्या निवड समिती सदस्य म्हणून प्रा. एकनाथ पगार (देवळा), प्राचार्य गोविंद काजरेकर (बांदा) व प्रा. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) यांनी काम पाहिले.