Seharnida Mushrif : मंत्री मुश्रीफांची सुनबाई बिनविरोध

Seharnida Mushrif

कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल नगरपालिका निवडणुकीत कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राजर्षी शाहू आघाडीला पहिले यश मिळाले. दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध निवडून आल्या आहेत. दरम्यान निवडणुका बिनविरोध करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाल्याने माजी खासदार संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरलेल्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले आहे. (Seharnida Mushrif)

काल छाननीनंतर अर्ज माघारीस सुरुवात झाली आहे. कागल नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक नऊ मधील महिला गटातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नुरजहाँ निसार नायकवडी आणि अपक्ष उमेदवार मोहबतमी अब्दुलरशीद शेख यांनी आज बुधवारी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. हसन मुश्रीफ यांचे धाकटे बंधू माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा आहेत. या निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांनी गैबी चौकात फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला. (Seharnida Mushrif)

पन्हाळा नगरपालिकेत भोसले बिनविरोध

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेत शिवशाहू आघाडीचे सतीश कमलाकर भोसले बिनविरोध निवड झाली आहे. शिवशाहू आघाडीने जनसुराज्य शक्ती पक्षाबरोबर युती केली आहे. प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण गटातून भोसले निवडणुकीच्या रिंगणात होते. (Seharnida Mushrif)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर