Scraping Centre: सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर

Scraping Centre

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुनःश्च वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणारे  राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटी महामंडळाकडून उभारले जाणार आहे.  सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर (पीपीडी) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील महामंडळाच्या १०० एकर जागेवर बांधण्याचा निर्णय महामंडळाच्या झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. (Scraping Centre)

 त्यातून भविष्यात उत्पन्नाचा वेगळा आणि शाश्वत स्त्रोत एसटीला निर्माण होणार असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. (Scraping Centre)

महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. केंद्र शासनाद्वारे सन२०२१ मध्ये रजिस्टर व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी नावाने १५ वर्षापेक्षा जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्यांच्या सुट्ट्या भागाचा पुनर्वापर होणार नाही, अशा पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावण्यात यावी यासाठी नवे धोरण बनवण्यात आले. हे धोरण महाराष्ट्र शासनाने सन २०२३ मध्ये स्वीकारले असून ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टॅंडर्ड (AIS) च्या अटी शर्तीनुसार स्क्रॅपिंग केंद्राला मान्यता देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार एसटी महामंडळालाही राज्यात ३ ठिकाणी अशा प्रकारचे स्क्रॅपिंग सेंटर उभारण्याची परवानगी मिळाली आहे. त्यांपैकी पहिले आणि राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे  १०० एकर जागेवर सार्वजनिक- खाजगी भागीदारीतून उभारले जाणार आहे.  या आढावा बैठकीमध्ये आवश्यक मनुष्यबळाची करार पद्धतीने भरती करणे, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्यांचे निकष ठरवून ते अमलात आणणे, नवे वाहन खरेदी धोरणबाबतही विषयावर चर्चा झाली. (Scraping Centre)

राज्यात ८ संस्था स्क्रॅपिंग केंद्र चालवत आहे. त्यांची वर्षाला किमान १००० वाहने स्क्रॅप करण्याची क्षमता आहे. भविष्यात सर्वाधिक वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याची विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे सेंटर उभाले जाणार असून एक नवा उत्पन्नाचा स्त्रोत  निर्माण होईल, असा दावा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला.

हेही वाचा :
अलमट्टीप्रश्नी १० जुलैला सांगलीत मोर्चा
सायबर भामट्यांचा निवृत्त अभियंताला ७.८६ कोटींचा गंडा

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर