कोल्हापूर : प्रतिनिधी : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या दहशतवादी संघटनेला आर्थिक सहाय्य करत असून कोणत्याही क्षणी देशद्रोहाच्या गुन्ह्यात डिजिटल अरेस्टची भिती दाखवून सायबर भामट्यांनी एका निवृत्त अभियंत्याला सात कोटी ८६ लाखांचा गंडा घातला. दत्तात्रय गोविंद पाडेकर (वय ७५, रा. तात्यासाहेब मोहिते कॉलनी, यशवंत लॉनजवळ, कोल्हापूर) असे निवृत्त अभियंत्यांचे नाव आहे. २६ मे ते २३ जून या कालावधीत हा गुन्हा घडला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. (7.78 crore scam)
भामट्याकडून मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील, कुलाबा पोलिस ठाण्यासह ईडी व सेबीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हुबेहुब आवाज काढून गंडा घातल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
पाडेकर हे गुजरात जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीज येथे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून १४ वर्षे कार्यरत होते. २०१२ मध्ये ते निवृत्त झाले. कंपनीने त्यांना २०१६-२०१७ मध्ये बोलावून घेतले होते. २०१७ पासून पत्नी सुरेखा यांच्यासमवेत कोल्हापूरात वास्तव्य करत आहेत. त्यांनी तिनही मुले परदेशात आहेत.
२४ मे २०१५ रोजी विजय कुमार नावाच्या वक्तीचा त्यांना मोबाईलवर फोन आला. आपण डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगून तुमचा डाटा लिक झाला आहे असे सांगितले. तसेच त्यांना आधार कार्डचे शेवटचे चार नंबर अंक विचारले. भामट्याने आधार कार्डचा वापर करुन २६ एप्रिल रोजी तुमच्या नावाने अंधेरी पूर्व मुंबई येथून नवीन मोबाईल विकत घेतला आहे असे सांगितले. त्या मोबाईलचा वापर करुन करुन अनधिकृत जाहिराती, फसवणूक आणि इतर लोकांना त्रास देण्यासाठी केला जात आहे. या प्रकरणी आर.पी. अलॉयसिस आणि अन्य २० तक्रारांनी तुमच्या विरोधात तक्रारी दिली आहेत, अशी भिती दाखवली. तसेच तुमच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती हॉटस् अपवर पाठवणार असल्याचे सांगितले. पाडेकर यांचे व्हॉटसअप बंद असल्याने भामटा विजयकुमार याने पाडेकर यांच्या पत्नी सुरेखा यांच्या नावावर मोबाईलची नोटीस पाठवली. त्यात मुंबई पोलिसांचा लोगो, इंग्रजीत पाडेकर यांचा मोबाईल नंबर होता. त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही लोकांचे फोटो पाठवले. पाडेकर यांच्या नावाने असलेले कॅनरा बँकेचा बोगस एटीएमचा फोटोही पाठवला. पाडेकर यांच्या नावाने असलेले कॅनरा बँकेचे बोगस एटीएमचा फोटोही पाठवला. (7.78 crore scam)
बँक खाते मुंबई शाखेचा असून त्याचा तपशील पाठवून पीएफआयला फंडिग झाल्याची भिती घातली. पाडेकर यांनी माझा काहीही संबध नसल्याचे सांगतले. मात्र यांनी भामटा विजयकुमार यांनी पुढील तपास कुलाबा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांच्याकडे सोपवली असल्याचे सांगितले. पिसे यांच्या ओळखपत्राची कॉपीही पाठवून कुलाबा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी यावे लागेल असे सांगितले. आपण ज्येष्ठ नागरिक असून मुंबईला येणे शक्य नसल्याचे पाडेकर यांनी सांगताच व्हॉटस अप कॉलवर चौकशी केली जाईल असे सांगून त्रयस्त यंत्रणेकडे हे प्रकरण वर्ग केले असे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षासंदर्भात असून देशाच्या संदर्भातील माहिती कोठेही प्रसारित करु नका, तुम्ही त्यांना सहकार्य करा अशी भिती घातली. (7.78 crore scam)
विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर
दरम्यान संदीप राव या भामट्याने ईडी कार्यालयातून बोलत पाडेकर यांना त्यांच्या कुटुंबाची माहिती सांगितली. पाडेकर यांनी माझा मनी लाँड्रिंगशी काहीही संबध नाही. कोणालाही पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. ही सायबर फसवणूक असून मी पोलिस ठाण्यात जात आहे असे सांगताच संदीप राव याने फोन बंद केला. काही वेळाने त्यांना मोबाईलवर अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगितले. नांगरे पाटील यांचा आवाज काढून भामट्याने संदीप राव हे आमचे वरिष्ठ अधिकारी असून त्यांना तुम्ही सहकार्य करत नाही, असे सांगितले. त्यानंतर पाडेकर यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस पाठवली. रिझर्व्ह बँक आणि सेबीची पत्रांचा मेसेज पाठवला. त्यानंतर पाडेकर यांना त्यांच्या नावावर असलेले शेअर्स विक्री करण्यास भाग पाडले.
साडेसात कोटीचे शेअर्सची विक्री
पाडेकर यांनी त्यांच्याकडील साडेसात कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली केली आणि मंगळवार पेठेतील एका बँकेच्या खात्यावर जमा केली. पत्नीच्या नावावरही ३० लाख रुपये त्यानंतर भामट्यांनी सर्व रक्कम आमच्याकडे जमा करा असले सांगितल्यावर २५ मे २३ जून या कालावधीत १५ वेगवेगळ्या बँक खात्यावर पावने आठ कोटी रुपये जमा केले. चौकशी पूर्ण होईपर्यंत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिल्याने पाडेकर यांनी ही रक्कम जमा केली. जमा केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी पाडेकर यांनी संबधिताच्या मोबाईलवर कॉल केला असता त्याने मोबाईल स्वीच ऑफ केला होता. त्यानंतर पाडेकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. (7.78 crore scam)