मुंबई : प्रतिनिधी : रायगडावरील भाषणात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या आणि औरंगजेबाच्या ‘थडग्या’ला ‘समाधी’ म्हणणाऱ्यांचा कडेलोट करणार का? अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. (Sanjay Raut Criticize)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी रायगडावर आले होते. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह प्रमुख मंत्री आणि नेते उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी जनसमुदायाला संबोधन केले. (Sanjay Raut Criticize)
अमित शहा यांच्या भाषणांवर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा कडेलोट करणार असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. पण त्यांच्यासमोर शिवरायांचा अपमान झाला. अमित शहा यांनी भाषणात ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख तीन वेळा केला. तसेच शहा यांनी औरंगजेबाच्या ‘थडग्या’चा उल्लेख ‘समाधी’ असा केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नव्हे का? असा सवाल करत त्यांचा कडेलोट करणार का? असा सवाल केला. द्रोपदीचे वस्त्रहरण होताना पांडव मान खाली घालून बसले होते तसेच काल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना तुम्ही मान खाली घालून बसला होता असा घणाघातही राऊत यांनी केला. (Sanjay Raut Criticize)
औरंगजेबचा आम्ही ‘थडगे’ असा उल्लेख करतो पण देशाच्या गृहमंत्र्यांनी शिवरायांच्या मेघडंबरीसमोर औरंगजेबाची ‘समाधी’ असा उल्लेख केला. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्या हा परिणाम आहे. गुजरातच्या नेत्यांना त्याच्याविषयी प्रेम आहे का? असा सवाल राऊत यांनी केला. (Sanjay Raut Criticize)
संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख समाधी असा केला तेव्हा छत्रपतींचे वंशज त्यांच्या बाजूला बसले होते. त्यांच्या वक्तव्यावर फडणवीस आणि अजित पवार यांनाही आक्षेप घ्यावा वाटला नाही. ‘थडग्या’ ऐवजी ‘समाधी’ हा शब्द दुसऱ्या कुणी काढला असता तर हिंदुत्वाचा कडेलोट झाला असता. औरंगजेबाचे उदात्तीकरण करतायेत असे म्हणत थयथयाट केला असता. अमित शहा यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख समाधी केला यावर त्यांच्या तोडून चकार शब्दही बाहेर निघाला नाही हे राज्याचे दुर्दव्य आहे, अस म्हणत संताप व्यक्त केला. (Sanjay Raut Criticize)
हेही वाचा :