Top Terrorist killed: ‘एलईटी’च्या दहशतवाद्याचा खात्मा

Top Terrorist killed

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तालिबा (एलईटी) चा एक सहकारी अल्ताफ लल्ली याचा खात्मा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. ( Top Terrorist killed)

अजसच्या कुलनार भागात झालेल्या गोळीबारात दोन पोलिस कर्मचारी गोळीबारात जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ताबडतोब जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

सुरक्षा दलांना परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान चकमक झाली. सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मिर पोलिसांनी शुक्रवारी (२५ एप्रिल) ही संयुक्त मोहीम राबवली. बांदीपोरा येथील कोलनार अजस परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली. येथे दहशतवादी लपल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. दोन्हीकडून गोळीबार सुरू झाला. अद्यापही कारवाई सुरू असल्याचे भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ‘एक्स’ वर म्हटले आहे. ( Top Terrorist killed)

२२ एप्रिल रोजी पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले होते. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून त्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी भारतीय लष्कराने अनेक शोध मोहिमा सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बांदीपोरा येथे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ( Top Terrorist killed)

पहेलगामजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बैसरन व्हॅलीमध्ये हा हल्ला झाला. तेथे मंगळवारी पर्यटकांच्या एका गटावर हल्ला करण्यात आला होता.

जम्मू काश्मिरसाठीचे ३७० हे विशेष कलम २०१९ मध्ये रद्द करण्यात आले. त्यानंतरच्या काळातील हा सर्वांत भयंकर दहशतवादी हल्ला मानण्यात येतो. या हल्ल्यातून बचावलेल्यांच्या मते, लष्कराच्या पोशाखात आलेल्या सहा दहशतवादी आले होते. त्यांनी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारला. आणि जवळून गोळ्या झाडल्या.

हेही वाचा :
दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटात उद्धवस्त

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर