नवी दिल्ली : बिहार राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी सत्तापालट होणार आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भाजपने सम्राट चौधरी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली आहे. सम्राट चौधरी हे एकेकाळचे नीतीश कुमारांचे कट्टर विराधक आहेत. (Samrat Chaudhary to become BJP’s first Chief Minister in Bihar)
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्यसभा खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर आज मंगळवारी १४ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर राजधानी पटना मध्ये भाजपच्या बैठकीत केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सम्राट चौधरी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली. उद्या बुधवारी १५ रेजी शपथविधी सोहळा होणार आहे. बिहारला पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री लाभणार आहे. (Samrat Chaudhary to become BJP’s first Chief Minister in Bihar)
सम्राट चौधरी यांचा परिचय… बिहारमधील प्रभावी नेते शकुनी चौधरी यांचे पुत्र असलेले सम्राट चौधरी यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६८ मध्ये झाला. लहानपणापासून घरात राजकीय वातावरण असल्याने सम्राट चौधरी राजकारणाकडे ओढले गेले. गेले ३५ वर्षे ते राजकारणात आहेत. सध्या ते मुंगेर जिल्ह्याचे आमदार असून त्यांच्या कुटुंबातील सदस्य शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय जनता दलातून सुरू झाली होती. राबडी देवींच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. २०१८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे सक्रीय नेते अशी त्यांनी ओळख ठळकपणे केली होती. (Samrat Chaudhary to become BJP’s first Chief Minister in Bihar)