कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

Salute to the martyrs of the movement against Kannada compulsion

बेळगाव : प्रतिनिधी : कन्नड सक्ती विरोधात एक जून १९८६ रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य  पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. (Salute to the martyrs of the movement against Kannada compulsion)

कन्नड सक्ती विरोधात १९८६ मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी बेछूट  गोळीबार केला. या गोळीबारात नऊ जणांनी हौतात्म्य पत्करले. दरवर्षी या हुतात्म्याना एक जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येते. (Salute to the martyrs of the movement against Kannada compulsion)

 महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उप महापौर रेणू किल्लेकर, युवा आघाडीचे अंकुश केसरकर आणि कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र आणि हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. सीमाप्रश्नाची सोडवणूक हिच हुतात्म्याना खरी श्रध्दांजली ठरेल असे विचार यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. (Salute to the martyrs of the movement against Kannada compulsion)

Related posts

रवीना टंडनच्या आईच्या घरी ८५ लाखांची चोरी; महिलेला अटक

शिक्षण विभागातील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

जिल्ह्यातील कुमकुवत नेतृत्वामुळे गोकुळ मध्ये मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप