दाते यांची ‘घरवापसी ; डीजीपी पदावर शिक्कामोर्तब?

Sadanand Date is the new DGP

जमीर काझी : मुंबई : महिना अखेरीस सेवानिवृत्त होत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांचा उत्तराधिकारी जेष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे ( एनआयए) प्रमुख पदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून राज्यात ‘घरवापसी’ करण्यात आले आहे. केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या प्रस्तावावर मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

दाते हे १९९० च्या आयपीएस अधिकारी असून त्यांच्या सेवानिवृती पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यत आहे. मात्र राज्य सरकारकडून पोलीस महासंचालक पदावर त्यांची दोन वर्षासाठी नियुक्ती दिला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी सदानंद दाते हे अपुरे कर्मचारी व शस्त्र असताना कामा रुग्णालयात प्रवेश करून अतिरेक्याना थोपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या शौर्यामुळे अनेक महिला व बालकांचा जीव वाचला होता.

केंद्रीय गृहमंत्र्याालयाकडून मुदतीपूर्वी केले कार्यमुक्त

  दोन वर्षांपासून डीजीपी म्हणून कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपत आहे, त्यामुळे त्यांच्या जागी प्रामाणिक अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या दाते यांची निवड करण्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची इच्छा असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार राज्य सरकारने त्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीतून कार्यमुक्त करून राज्यात पाठविण्याबाबत प्रस्ताव दिला होता.त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयालयाने निर्धारित मुदतीपूर्व त्यांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीत ठेवला होता. त्याला मंजुरी दिल्याने दाते यांना तत्काळ प्रभावाने महाराष्ट्रातील त्यांच्या मूळ केडरमध्ये परत पाठवलं जात आहे.

युवा अधिकाऱ्यांसाठी दातेंचा प्रवास प्रेरणादायी

 महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी दाते यांचा प्रवास पोलीस दलातील युवा अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी मानला जातो. महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे त्यांच्या कठोर निर्णयांसाठी ओळखले जातात. २०१५ मध्ये त्यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ ) महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. त्याच वेळी छत्तीसगडसह देशाच्या अनेक भागात नक्षलवादी हिंसाचार झाला होता. त्यावेळी सशस्त्र मोहीम सुरू करण्यात आली होती.   

विविध पदांवर उल्लेखनीय काम

 गडचिरोली इथे नक्षलवादी आघाडीवर नियुक्ती करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांना सीआरपीएफमध्ये आयजी पदावर बढती मिळाली होती. तसंच त्यांना सीआरपीएफचे स्पेशल आयजी बनवण्यात आलं होतं. यानंतर ते सीआरपीएफमध्ये डीजी म्हणून पाच वर्षे प्रतिनियुक्तीवर होते. यानंतर त्यांच्याकडे एनआयएची कमान सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.मुंबईत त्यांनी अप्पर आयुक्त म्हणून तसेच सहआयुक्त (गुन्हे ) म्हणून काम केले आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर