सचिन अहिरांना पक्षांतरबंदीचा फटका?

Sachin Ahir hit by anti-defection rules

जमीर काझी :  मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडल्याची घटना ताजी उमटत सोमवारी त्यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला. विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी ठाकरेची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून महायुतीचे उपसभापती पदासाठीचे ते उमेदवार बनले. सचिन अहिर यांच्यावर पक्षांतरबंदीचा फटका बसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बुधवारी या पदासाठीची निवडणूक होणार असून महाविकास आघाडी कडून ज. मो .अभ्यंकर हे उमेदवार आहेत. (Sachin Ahir hit by anti-defection rules)

पक्षांतरबंदीचा फटका बसणार का?.

पक्षांतरबंदी कायद्याच्या तांत्रिक तरतुदींमुळं सचिन अहिर यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही. त्यामुळ आधी सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरून पद मिळवल्यानंतर पक्षप्रवेश करावा असं नियोजन केल्याचे समोर येत आहे. कारण, भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचित पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित एकूण ८ परिच्छेद आहेत. यामध्ये हा कायदा कोणाला लागू होतो? आणि कोणाला नाही? याचे सविस्तर नियम दिले आहेत. कायद्यातील परिच्छेद पाचनुसार सध्या सचिन अहिर यांच्यासाठी कायदेशीर संरक्षण कवच ठरला आहे. या परिच्छेदानुसार, काही घटनात्मक पदांवर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेतून विशेष सूट देण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, विधानसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती-उपसभापती, यासारख्या सर्वोच्च आणि तटस्थ पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींचा समावेश होतो. सचिन अहिर यांच्याकडं सध्या विधान परिषदेच्या उपसभापती पदाची धुरा (किंवा तत्सम घटनात्मक जबाबदारी) देण्याचं नियोजन असल्यामुळं या विशेष तरतुदीचा फायदा त्यांना मिळत आहे. या कारणामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Sachin Ahir hit by anti-defection rules)

अहिर यांचा शेवटच्या क्षणी ठाकरेना झटका

अहिर यांनी विधान भवनात आज मंगळवारी सकाळी पोहचले. त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार ज.मो.अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी अंबादास दानवे यांनी सचिन अहिर यांना आपण एकत्र फोटो घेऊया असे सांगितले त्यावर अहिर यांनी मी महायुतीच्या वतीने अर्ज भरण्यासाठी आलो असल्याचे सांगून त्यांना धक्का दिला. त्यानंतर अहिर यांनी आपण ठाकरे गट सोडत असल्याचे मेसेज उद्धव व आदित्य ठाकरे तसेच ठाकरे गटाच्या आमदारांना केला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे आदी उपस्थित होते.

काही कारणास्तव ठाकरे गटाला रामराम

मी कोणत्याही स्वार्थासाठी पक्ष सोडलेला नाही तर काही कारणास्तव बदल केला आहे त्याबाबत मी राजकीय भूमिका योग्य वेळी जाहीर करीन असे फुटीर आमदार सचिन अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट न करता योग्य वेळी बोलू, असे सांगितले.

ठाकरे गटातील एकेक एक विकेट पडणार

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केले. त्यामुळे ते शिवसेनेचेच आमदार आहेत. आठवडाभरापूर्वी खासदारांनी षटकार ठोकले आज आमदार अहिर यांनी षटकार ठोकला, यापुढे चौकार, षटकार सुरुच राहतील आणि त्यांच्यातील एक एक विकेट पडेल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. त्यांनी अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीचे कौतुक केले. विधानसभा आणि विधानपरिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. बुधवारी अहिर यांची उपसभापतीपदी निवड होईल. 

बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या मतदार संघांचा उद्धव ठाकरे यांनी दौरा आटोपून मुंबईत परतलेल्या शिव्या सेनेच्या प्रमुखांचे आमदार अहिर यांनी सोडचिठ्ठी देत स्वागत केले, असा टोला शिंदे यांनी यावेळी लगावला. 

देवेंद्रजींबद्दल आता पुतनामावशीचे प्रेम

.मुख्यमंत्री देवेंद फडणवीस पंतप्रधान होत असेल तर त्याला आपला पाठिंबा राहील, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आता काहीना पुतना मावशीचे प्रेम आले आहे, २०१९ मध्ये त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. इतक्या जलदगतीने रंग बदलणारा सरडा पाहिला नाही, असा टोला लगावला. (Sachin Ahir hit by anti-defection rules)

Related posts

तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो….

आमदार क्षीरसागरांनी मांडले वकिलांना संरक्षण देणारे महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक

राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; उद्धव ठाकरेंचे भाजपा विरुद्ध रणशिंग