राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा चाकणकरांचा राजीनामा; अन्य नेत्यांवर कारवाई कधी?

Rupali Chakankar's Resignation

मुंबई : प्रतिनिधी : नाशिकाचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्या ट्रस्टशी संबधित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला. मुख्यमंत्र्याच्या नावाने राजीनाम्याचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिले. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळातील मंत्री, नेत्यांचाही अशोक खरातशी संबध असल्याने त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. मंत्रीमंडळातील नऊ मंत्र्याचा कॅप्टन खरातच्या गैरकृत्याशी संबध होता असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान पुण्यामध्ये खरात आणि चाकणकरांच्या विरोधात काँग्रेस महिला आघाडीने निदर्शने केली.

कॅप्टन खरात याची चौकशी करण्यासाठी राज्यसरकारने एसआयटी नेमली आहे. पोलिस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली खरात आणि त्याच्या पिलावळीची चौकशी सुरू आहे. ही चौकशी समिती रुपाली चाकणकर आणि अन्य मंत्री, नेत्यांची चौकशी करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Rupali Chakankar’s Resignation)

काल शुक्रवारी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधना चाकणकर म्हणाल्या, खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानले होते. गुरुपोर्णिमा किंवा महाशिवरात्रीच्या कार्यक्रमांना आम्ही सहकुटुंब जात होतो. पण ही व्यक्ती पुढे जाऊन काय कृत्य करणार आहे किंवा तिचे वैयक्तिक आयुष्य कसं आहे याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी पोलिस महासंचालक आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. खरातसोबत माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो आहेत. परंतु एक महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले याचे वाईट वाटतंय असेही त्या म्हणाल्या. (Rupali Chakankar’s Resignation)

चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुनेत्रा पवारांकडे राजीनामा देताना चाकणकर यांची बॉडी लॅग्वेजबाबत दमानिया यांनी भाष्य केले. राजीनाम्याचे पत्र देताना सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता तर चाकणकर यांची पोझ मॉडेलिंगसारखी होती अशी टीका केली. (Rupali Chakankar’s Resignation)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?