Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोला अश्रू अनावर….

Ronaldo

म्युनिच : युईएफए नेशन्स लिगच्या अंतिम सामन्यात स्पेनला हरवल्यावर फुटबॉल दिग्गज खेळाडू आणि पोर्तुगल आयकॉन कर्णधार ख्रिस्तियाने रोनाल्डोला अश्रू अनावरण झाले. पोर्तुगालने बलाढ्य स्पेनला पेनल्टी शूटआउटमध्ये ५-३ अशा फरकांनी हरवले. पूर्णवेळेत सामना २-२ असा बरोबरी राहिला होता. संघाने विजय मिळवला तेव्हा ४० वर्षीय रोनाल्डोने राखीव बेंचवर बसून सामना पाहिला. पण तत्पूर्वी त्याने केलेल्या गोलमुळे पोर्तुगलने सामन्यात कमबॅक करत सामना २-२ बरोबरीत आणला. (Ronaldo)

पेनल्टी शूटआउटमध्ये रुबेन नेव्हसचा किक लागताच ४० वर्षीय रोनाल्डोने गुडघ्यावर पडून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. २०१६ नंतर युरो फायनलमध्ये फ्रान्सविरुद्ध सामना जिंकून जेतेपद पटकावले होते. तेव्हाही त्याला अश्रू अनावर झाले होते. (Ronaldo)

सामन्यात पहिल्या गोलची नोंद स्पेनने केली. २१ व्या मिनिटाला मार्टिन झुबिमेंडीने गोल केला. त्यानंतर स्पेनच्या समर्थकांनी जल्लोष केला पण त्यानंतर पाचच मिनिटात सुत्रबद्ध चढाया करणाऱ्या पोर्तुगालने गोलची परतफेड केली. डिफेंडर नुनो मेंडेसने गोल केला. त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल होता. स्पेनच्या हाफटाइमध्या अगदी आधी पुन्हा आघाडी मिळवली. मिकेल ओयारझाबालने गोल केला. (Ronaldo)

गोलची परतफेड करण्यासाठी पोर्तुगालचा कर्णधारच धाऊन आला. ६१ व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल केला. नुनो मेंडेसच्या क्रॉसवर गोल केला. रोनाल्डोचा त्याच्या कारकीर्दीतील ९३८ गोल केला. ८८ व्या मिनिटाला दुखापत झाल्याने रोनाल्डो बाहेर गेला. त्याच्या जागी फॉरवर्ड गोंकालो रामोसला संधी देण्यात आली. अंतिम सामना जिंकल्यानंतर रोनाल्डोची अश्रुंनी भरलेली प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्हायरल झाली. चाहत्यांनी पाच वेळा बॅडन डी ओर जिंकणाऱ्या रोनाल्डोला पाठिंबा दिला. (Ronaldo)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

फिफा वर्ल्डकप मॅच दिवशी शाळा बंद