नवनीत राणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करा 

Register a case against Navneet Rana under the POCSO Act

जमीर काझी :  मुंबई : अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडिताची ओळख उघड करणाऱ्या भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेते आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी कडाडून हल्लाबोल केला आहे. राणा यांच्यावर ‘पोक्सो ‘अंतर्गत गुन्हा दाखल करावा, आणि धार्मिक दंगली घडवू पाहत असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Register a case against Navneet Rana under the POCSO Act)

 परतवाडा येथील अनेक तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणा संदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सुरुवातीपासून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा भरपूर प्रयत्न झाला. आयोगाच्या  पथकाने  परतवाडाला जाऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून माहिती घेतली आहे. नवनीत राणा यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणात जाणीवपूर्वक दोन समाजात संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न केला. दोन समाजात तणाव निर्माण व्हावा, या उद्देशाने   अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. अफवा पसरवणाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना केल्यात. कितीही उच्च पदावर असला तरी त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे.”

प्यारे खान म्हणाले,’ भाजपा पक्षश्रेष्ठींनी नवनीत राणा यांना पक्षातून काढले  पाहिजे. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर उभ्या असलेल्या भाजपाला त्यांच्यासारख्या  नेत्यांची अजिबात गरज नाही. त्यांची पक्षातून हकालपट्टी झालीच पाहिजे, अशी मागणी करणारे एक पत्र आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना पाठवले जाणार आहे. (Register a case against Navneet Rana under the POCSO Act)

“या प्रकरणातील पीडितांच्या पालकांनी देखील नवनीत राणा यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे. कायद्यानुसार, त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते,या संपूर्ण प्रकरणात कोणताही धार्मिक रंग नाही. नवनीत राणांनी रीलसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. जर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींबरोबर फोटो काढले असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. समाजाने आरोपीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे,” असेही  त्यांनी सांगितले. (Register a case against Navneet Rana under the POCSO Act)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर