….पोलिस बाजूला ठेऊन या; राऊतांचे महाजनांना आव्हान

Raut's warning to the rebel MP

नवी दिल्ली :  राडे करण्याची शिवसेनेची क्षमता नाही या मंत्री गिरीश महाजन यांच्या टीकेचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेची भिती नाही, राडे करण्याची क्षमता नाही म्हणता मग बंडखोरांना सुरक्षा का पुरवता. त्यांना वाय प्लस, सीआरपीएफ यांची सुरक्षा कशाला देता. यापूर्वी गद्दारी केलेल्यांना सुरक्षा आहे. गिरीश महाजनांनी स्वत: ची सुरक्षा हटवावी, सरकारी कवचकुंडले काढावीत. याच सुरक्षेत राहून तुम्ही आम्हाला राडा करण्याची क्षमता सांगत आहेत. आमच्या राडेबाजीला आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचे असेल तर पोलिस बाजूला ठेऊन या. संघाच्या चड्ड्या, विचार आम्हाला सांगू नका, असे आवाहन राऊत यांना दिले. (Raut challenges Mahajan)

शिवसेनेचे सहा खासदार हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. आता आम्ही शांत बसणार नाही. गुद्दारांना तुडवणार. आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राऊतांच्या या इशाराने राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिवसेनेपासून वेगळे झालेल्या सहा खासदारांची घरे, निवास, व्यावसायिक जागांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Raut challenges Mahajan)

कुंभमेळ्याच्या हिंदूत्वाच्या नावाने भ्रष्टाचार

गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री आहेत. नाशिक कुंभमेळ्यात हिंदुत्वाच्या नावाने सर्वात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचार कंत्राटदाराची यादी माझ्याकडे आहे असा दावाही राऊत यांनी केला. माझ्याकडे अर्धा दिवस ईडी आली तर सर्वात आधी गिरीश महाजनांना फोडून दाखवतो असे आव्हानही राऊत यांनी दिले. (Raut challenges Mahajan)

पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना तुडणार

राऊत म्हणाले, पक्षाची गद्दारी करुन आणि शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत. तसेच थेट जनतेच्या दारात आणि मैदानात उतरुन पक्ष मजबूत करणार आहोत. ज्यांनी पक्षाचे नुकसान केले आहे त्यांना तुडवणार आहे. याच अभियानाला आम्ही ऑपरेशन तुडवा असे म्हणत आहोत.

रोहित पवार शिवसेनेत फूट पडली असे म्हणतात पण आम्ही त्याला गद्दारी आणि बेईमानी म्हणतो. हे लोक पैशाने विकत गेले आहेत. यापूर्वीच त्यांना १५ कोटी रुपये दिले आहेत आणि आणखी काही कोटी दिले जाणार आहेत. तसेच २५० कोटींचा निधीही दिला जाणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले. (Raut’s warning to the rebel MP)

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्या भाषेवर टीका केली. त्यावर राऊत म्हणाले, जो माणूस मंत्री असताना शेतकऱ्यांना साले, चोर, लफंगे, दरोडेखोर म्हणतो त्यांनी माझ्या भाषेवर आक्षेप कसे घेतले असा प्रश्न केला. (Raut’s warning to the rebel MP)

Related posts

गडचिरोलीतील लोहखनिज खाणी राज्याला द्या

डॉ.महादेव नरके यांचे पुस्तक संशोधकांसाठी दिशादर्शक :  डॉ. संजय पाटील

फुटीवर शिक्कामोर्तब, फुटिरांना शिवसैनिक तुडवणार?