Raut’s criticism of Shinde : एकनाथ शिंदेची संपत्ती पाच लाख कोटी कशी झाली ? : संजय राऊत

Raut's criticism of Shinde

मुंबई : प्रतिनिधी : एका रिक्षावाल्याची संपत्ती पाच लाख कोटी कशी झाली असा सवाल उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उप मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. (Raut’s criticism of Shinde)

 दसरा मेळाव्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी उद्धव ठाकरेंना कटप्रमुख म्हटले आहे असा प्रश्न पत्रकारांना विचारला असता खासदार राऊत म्हणाले की, “हो, आम्ही आहोत कटप्रमुख. आम्ही काहीही गमावले नाही. हे नेते कोण ? त्यांना उद्धव ठाकरे यांनीच नेता केला, तेही आमच्या आग्रहामुळेच. यांना बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलेले नाही. बाळासाहेबांनी फार कमी लोकांना नेता केले, त्यापैकी मी एक होतो. पण तुमच्यासारखा एक रिक्षावाला, आज पाच लाख कोटींचा मालक कसा झाला?  एका वेळेला पन्नास, पन्नास कोटी रुपये निवडणुकीवर उधळता, हे उद्धव ठाकरेंमुळेच शक्य आहे. नाहीतर तुम्ही कोण होतात ? याचे आत्मचिंतन त्यांनी आनंदआश्रमात जाऊन केले पाहिजे,” (Raut’s criticism of Shinde)

खासदार राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका करतान, एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया किंवा बॅरिस्टर पै नाहीत. एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या बेनामी कंपनीचे इकडचे ब्युरो चीफ आहेत. त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली आहे ती बोगस आहे, उद्या जेव्हा सरकार जाईल त्या बेनामी कंपंनीच्या सगळ्या चौकश्या होतील असा इशारा राऊत यांनी दिला. एकनाथ शिंदे कालच्या सभेत म्हणाले की मराठी माणूस शिवसेनेमुळे, ठाकऱ्यांमुळे हद्दपार झाला. अशा प्रकारे जर वक्तव्य केले असेल तर आधी आरशात पाहिले पाहिजे. जे आमदार तुमच्यासोबत पळून गेले ते शिवसेनेचे होते. शिवसेनेमुळे  त्यांची किंमत ५० ते १०० कोटी झाली.  त्या मराठी माणसांची. सूरतला, गुवाहाटीला कोण पळून गेले ? अशीही टीका केली. (Raut’s criticism of Shinde)

मुंबईतला, ठाण्यातला, महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धेने, निष्ठेने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासोबतच आहे. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा अमित शहांनी उचलला आहे आणि मुंबई अडानीसारख्या उद्योगपतीला विकण्याचा चंग बांधला आहे, त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुसे आहेत. अमित शहांनी मुंबईत ज्या प्रकारचे राजकारण सुरू केले आहे, मराठी माणसापासून तोडण्याचे, त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का ? नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये, असा टोला सुद्धा खासदार संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लगावला आहे. (Raut’s criticism of Shinde)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला