उमेदवाराला पोलिस गाडीतून उपमुख्यमंत्र्याच्या घरात नेतात हे लोकशाहीसाठी घातक : संजय राऊत

Raut criticizes the Thane video

मुंबई : प्रतिनिधी : ठाणे शहरात पोलिस उमेदवाराच्या घरात जाऊन त्याला गाडीत टाकतात आणि थेट उप मुख्यमंत्र्यांच्या घरात घेऊन जातात हे लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग थांबवून समोरुन लढावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत टीका केली. (Raut criticizes the Thane video)

मनसे नेते अविनाश जाधव यांच्या व्हिडीओवर बोलताना खासदार राऊत  म्हणाले की, “पोलीस उमेदवारांच्या घरात जाऊन त्याला गाडीत घालून  आणि थेट उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी घेऊन येतात, हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे.  हे काम करण्यासाठी पोलिसांवर दबाव असण्याची शक्यता आहे.  पोलिसांनी त्यांचे काम इमानदारीने केले असले, तरी हे चित्र संतापजनक आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोग काहीही ठोस कारवाई करणार नाही. निवडणूक आयोग केवळ अहवाल मागवेल आणि चौकशीचे आश्वासन देऊन वेळ काढेल. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालयात जाणे हाच योग्य मार्ग उरला आहे,” असे म्हणत त्यांनी टीका केली. (Raut criticizes the Thane video)

पोलिसांच्या मदत  उमेदवार घेऊन जात आहेत, म्हणजे सत्ताधारी शिवसेना किंवा मनसेला घाबरलेले आहेत. मशाल आणि इंजिनची भिती घेतली आहे. तुम्ही आमचे पक्ष आणि चिन्ह चोरलेले आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत. तुम्हीही आमच्यासमोर लढा,” असे थेट आव्हान संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. (Raut criticizes the Thane video)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार