आमचे ६० नगरसेवक फोडले. त्यातले ९० टक्के पराभूत झाले

Raut criticizes Shinde

मुंबई : प्रतिनिधी : आमचे ६० नगरसेवक फोडले. त्यातले ९० टक्के पराभूत झाले असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी जयचंदगिरी केली नसती तरी मुंबई भाजपचा महापौर झाला नसता, अशी टीकाही राऊत यांनी केली.

खासदार राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आणि भाजपने  आमचे ६० नगरसेवक फोडले. त्यातले ९० टक्के पराभूत झाले. शिवसेना आणि मनसेने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ७१ जागा जिंकल्या. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्यामागे ठाम उभा राहिला. त्यामुळे ७१ जागा या परिस्थितीत जिंकणे, हे मोठे यश आहे, असे राऊतांनी म्हटले. (Raut criticizes Shinde)

खासदार राऊत यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.  एकनाथ शिंदे हे जयचंद झाले नसते तर या भाजपच्या १०० पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भाजपचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जयचंदगिरी केली, त्यामुळे भाजपची सत्ता येत आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे तीनचे बहुमत आहे. म्हणजे, साधारण 110 लोक विरोधामध्ये आहे.  शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचे १०० पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे हा विरोधकांचा आकडा काही कमी नाही. त्यांना इकडची काडी तिकडे करू देणार नाही. महाराष्ट्र किंवा मुंबईच्या संदर्भात काही चुकीचे करणार असतील तर तितकी ताकद ही महापालिकेत विरोधकांची आहे, असेही राऊतांनी म्हटले. (Raut criticizes Shinde)

आमच्या १२ ते १३ जागा या ५० ते २०० मतांच्या फरकाने पडल्या आहेत. आम्ही सत्तेशी, झुंडशाहीशी आणि पैशाच्या ताकदीशी खूप मोठा संघर्ष केला. तरी आम्ही या स्थितीपर्यंत आलो की या महापालिकेत त्यांना चुकीचे काम करण्यापासून रोखू शकतो, असा इशाराच खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे यांनी महायुतीला दिला आहे. (Raut criticizes Shinde)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर