रश्मी शुक्ला पुन्हा डीजीपीपदी नको 

मुंबई; विशेष प्रतिनिधी  : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने त्या आदेशाचे उल्लंघन करत तात्पुरती नियुक्ती, असा आदेश काढलेला आहे. त्यामुळे शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर व  वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी ठरेल. त्यांना पुन्हा सेवेत न घेण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल यांना पत्राद्वारे केली आहे.

त्यात म्हटले आहे, की  शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना  हटवले आहे, परंतु त्यांना पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगालाही याबाबत हस्तक्षेप करण्यासाठी पत्र पाठवले आहे, परंतु अद्याप त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. शुक्ला यांना निवडणुकीनंतर पुन्हा डीजीपीपदी नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा काही इरादा असेल तर तो कायदेशीर व प्रशासकीय गुंता निर्माण करणारा ठरू शकतो. सशर्त अटीमुळे  महासंचालकांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करणारा ठरतो. निवडणूक काळापुरता पोलीस महासंचालक व निवडणुकीनंतरचा पोलीस महासंचालक अशा नियुक्तीमुळे प्रशासकीय संबंधित मूलभूत घटनात्मक तत्त्वे, पदानुक्रम आणि अधिकाराच्या पृथक्करणावर परिणाम होतो. या कृतीमुळे घटनात्मक संतुलनाला बाधा पोहोचून कायदेशीर अनिश्चितता उद्भवू शकते. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी २८ डिसेंबरला मोर्चा

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ