इराणला साथ दिली नाही तर भविष्यात भारताला त्रास होणार : राज ठाकरे

Raj Thackeray's support for Iran

मुंबई : प्रतिनिधी : इराणने भारताला अनेक वर्षे साथ दिली आहे. इराणला साथ दिली नाही तर भविष्यात भारताला त्रास होईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात ते बोलत होते. सरकारला प्रश्न विचारु नये म्हणून करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले आहे या कडे लक्ष वेधत करमणुकीच्या जंजाळातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले.  

राज ठाकरे यांनी आखाती युद्ध, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ड्रगचा विळखा, महाराष्ट्रावरील कर्ज या विषयावर मते व्यक्त केली. महाराष्ट्राला लाभलेल्या महान व्यक्तीमत्वाची आठवण करुन देत महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सत्ता घेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र घडवण्यासाठी जनेतकडून येणाऱ्या सूचनांसाठी मनसेकडून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र नेक्स्ट  नवीन वेबसाईटची घोषणा केली. (Raj Thackeray’s support for Iran)

काश्मीर प्रश्नांवर इराणची भारताला साथ

गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन राज ठाकरे यांनी भाषणास सुरूवात केली. महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी सत्ता घेणार आहे आहे असा विश्वास व्यक्त केला. आखाती युद्धावर भाष्य करताना भारताने इराणला साथ दिली पाहिजे असे मत व्यक्त केले. इराणकडून भारतात येणारे तेल डॉलरमध्ये न देता भारतीय मुल्यामध्ये रुपयामध्ये देतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. इराणवर झालेल्या हल्यानंतर पंतप्रधानांनी एकही निषेधाचे पत्रक काढायला पाहिजे, असे मत व्यक्त केले.  इराणला आपण साथ द्यायला हवी होती. इराण अनेक वर्षे आपल्याला साथ देता होता. काश्मीर प्रश्नांवर आपण साथ देतो होता. इराणला साथ दिली नाही तर भविष्यात आपल्याला त्रास होईल, असेही मत व्यक्त केले. (Raj Thackeray’s support for Iran)

सरकारला प्रश्न विचारु नये म्हणून करमणुकीच्या जाळे

 इन्स्टाग्रॅममधून बाहेर पडा असे आवाहन करताना देशात सर्वांना करमणुकीमध्ये गुंतवणूक ठेवले जात ठेवले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.  आयपीएल सुरू आहे. चित्रपट येत आहेत. हाऊसफुल्ल होतायेत. सरकारला प्रश्न विचारु नये यासाठी गुंतवून ठेवले आहे असा आरोपही त्यांनी केला. देश विचित्र व्यवस्थेत अडवले आहेत. करमणुकीच्या गटारगंगेत तुम्ही वाहून जाऊ नका असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्टावर ११ लाख कोटीचे कर्ज

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियनच्या वर नेण्याची घोषणा मुख्यमंत्री करत आहेत पण राज्यावरचे कर्ज ११ लाख कोटीवर गेले आहे याकडे लक्ष वेधताना २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात राज्यावरचे कर्ज दोन लाख कोटीपर्यंत होते. १२ वर्षात कर्ज कुठे पोचले आहे या असा सवालही त्यांनी केला.

 तीनवेळा कर्जमाफी होऊनही देशात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. शहरातील सगळ्या जमिनी जात आहेत. सगळ्या जमिनी अदानी विकत घेत आहे. महाराष्ट्र स्वत: अस्तित्व, भाषा गमावून बसणार आहोत. त्यासाठी सर्वांनी सजग राहण्याचे आवाहनही केले.

गृहखात्याचे वाभाडे

मुख्यमंत्री गृहमंत्री असून सगळीकडे ड्रग विकले जात आहे. शाळांमध्ये ड्रग विकले जात आहे.  तरुण तरुणी ड्रगच्या विळख्यात आहेत. महाराष्ट्रात लहान मुले, युवक, युवती बेपत्ता होत आहेत. एनसीआरटीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात साडेचार ते साडेपाच हजार बेपत्ता होत आहेत. त्यांच्या आईवडीलांची स्थिती काय होत असेल असा सवाल राज ठाकरे यांनी करत गृहखात्याचे वाभाडे काढले. (Raj Thackeray’s support for Iran)

 महाराष्ट्राची परंपरा सांगताना महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक, कलाकार, राजकारणी, सहकारातील प्रमुख महनीय व्यक्तींची नामावली वाचून दाखवता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केला. शरद पवारांचे फलोत्पादानातील क्रांतीचा त्यांनी गौरव केला. नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी त्यांनी नवीन वेबसाईटची घोषणा केली. (Raj Thackeray’s support for Iran)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर