विश्वास नांगरे-पाटील यांनी राजीनामा देऊन आरएसएस, भाजपात सहभागी व्हावे

Raj Thackeray criticizes IPS officer Nangare Patil

जमीर काझी : मुंबई : जेष्ठ  आयपीएस अधिकारी व नागपूरचे नूतन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) जाहीर स्तुतीसुमनाबद्दल आणखी वादात सापडले आहेत. काँग्रेस पाठोपाठ मनसेने उघडपणे विरोध दर्शविला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नांगरे- पाटील यांनी पोलीस दलाचा राजीनामा देऊन खुशाल आरएसएस किंवा भाजपात प्रवेश करून आमदार, खासदार व्हावे, असा हल्लाबोल केला आहे. (Raj Thackeray criticizes IPS officer Nangare Patil.)

नांगरे पाटलांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल

‘मविआ च्या शासनकाळात भाजपाचे वादग्रस्त नेते किरीट सोमय्या यांच्या निशाणावर असलेले आयपीएस नागरे -पाटील आता आरएसएस आणि भाजपच्या ‘ गुड बुक’मध्ये आहेत. नुकतीच त्यांची संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली आहे. त्यामागे त्यांनी आरएसएसच्या एका कार्यक्रमात हजेरी लावून गोडवे गाणे होते, अशी चर्चा राजकीय व पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यांचा आरएसएसबद्दलच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेसने त्याबाबत उघड भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरेनी त्यांच्या वर्तनावर कठोर टीका केली आहे. सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहित त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. त्यात म्हटले आहे की, विश्वास नागरे -पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे. ते एक पोलीस अधिकारी असल्याने त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे  त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. एका  संमेलनात जाऊन त्यांनी संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. (Raj Thackeray criticizes IPS officer Nangare Patil.)

नांगरेकडून निष्पक्षता अपेक्षित

मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच  आहेत.  विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे. नांगरे- पाटील हे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत असताना निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचे  भान विसरले आहे. तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचे असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. असे सांगून राज यांनी म्हटले आहे की,सध्या  अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही होईल. 

त्यांची दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना कशी चालते

तुमच्या  वर्दीचा खाकी रंग हा पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो  संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच समोर आले आहे. असा टोला लगावून राज यांनी म्हटले आहे की,. त्यांची दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका , अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन  करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत ,याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारची दुहेरी भूमिका

 मनसेने २०१२ मध्ये रझा अकादमीच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने  माझे अभिनंदन के तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मग हीच भूमिका सरकार नांगरे- पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी का ? असा सवाल त्यांनी सरकारलाही विचारला आहे. (Raj Thackeray criticizes IPS officer Nangare Patil.)

Related posts

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा

गांधीनगरातील घुसखोर बांग्लादेशींना सक्तमजुरीची शिक्षा