राज्य कला प्रदर्शनात राज सूर्यवंशीची कलाकृती झळकली

Raj Suryavanshi's artwork at the State Art Exhibition

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य संचलित ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) २०२५-२६ मध्ये कोल्हापूरच्या १९ वर्षीय राज चंद्रशेखर सूर्यवंशी याच्या कलाकृतीची निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रसिद्ध् जहाँगिर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात त्याची कलाकृती मांडण्यात आली आहे. १६ मार्च पर्यंत हे प्रदर्शन सर्वांना खुले राहणार आहे. (Raj Suryavanshi’s artwork at the State Art Exhibition)

प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते १० मार्च रोजी. यावेळी कला आणि प्रशासन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी तसेच कला संचालनाचे संचालक डॉ. किशोर इंगळे आणि ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांची प्रमुख उपस्थिती होती. (Raj Suryavanshi’s artwork at the State Art Exhibition)

या प्रदर्शनातील ‘मुद्रण कला'( print making ) विभागात राज सूर्यवंशी याची ब्रास मेटल इचिंग प्रोसेसमधील ओल्ड लेडी ही कलाकृती असून त्याचे कलेचे आणि यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला मनोज दरेकर, हर्षवर्धन मनिपद्म, किशोर राठोड, शैलेश राऊत यांचे मार्गदर्शन तर वडील चंद्रशेखर सूर्यवंशी, आई रोहीणी सूर्यवंशी यांचे प्रोत्साहन लाभले. (Raj Suryavanshi’s artwork at the State Art Exhibition)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर